जबरदस्त! किंग खान, कोहलीमागोमाग अमिताभ बच्चनसुद्धा झाले अलिबागकर; 83 व्या वाढदिवसानिमित्त...

Happy Birthday Amitabh Bachchan : 83 व्या वाढदिवसानिमित्त बिग बींचं स्वत:लाच दिलं ₹65900000 चं गिफ्ट; अलिबागशी आहे खास नातं... पाहा आजच्या दिवसातील एक सुरेख बातमी... 

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 11:07 AM IST
जबरदस्त! किंग खान, कोहलीमागोमाग अमिताभ बच्चनसुद्धा झाले अलिबागकर; 83 व्या वाढदिवसानिमित्त...
happy birthday Amitabh Bachchan gifts himself plot in Alibaug worth rupees 6 crores latest update

Happy Birthday Amitabh Bachchan : शतकातील महानायक अशी ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. हिंदी कलाविश्वामध्ये कमाल योगदान देणाऱ्या आणि अभिनयासह भाषा, साहित्य आणि कलेच्या प्रत्येक माध्यमाचा समतोल राखणाऱ्या या कलाकारानं आता स्वत:साठीच एक निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रातील एका सुरेख अशा ठिकाणी बिग बींनी स्वत:साठीच एक खास भेट खरेदी केली असून, वाढदिवसानिमित्त त्यांनी हीच भेट स्वत:ला दिल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत 'प्रतीक्षा' आणि 'जलसा' अशा आलिशान बंगल्याची मालकी असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आता स्वत:साठी एक कमाल संपत्तीची खरेदी केली आहे. 

अलिबागच्या प्रेमात बिग बी!

उपलब्ध माहितीनुसार मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं त्यांनी तीन लक्झरी प्लॉट खरेदी केले आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील या महानायकानं अलिबागमधील भूखंडांसाठी 6.59 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम खर्च केल्याचं म्हटलं जात आहे. 

नोंदणीकृत कागदोपत्री पुराव्यांनुसार साधारण 9557 चौरसफूटांचा हा एकत्रित भूखंड असून, 96, 97 आणि 98 असा त्याचा क्रमांक आहे. या भूखंडांसाठी बच्चन यांनी 39.58 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचंही म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिग बींनी हे प्लॉट Abhinandan Lodha (HoABL)’s Phase 2 development अंतर्गत खरेदी केले आहेत. याआधी त्यांनी 2024 च्या एप्रिल महिन्यात अलिबागमध्ये 10000 चौरस फुटांचा भूखंड 10 कोटी रुपयांना खरेदी केला होता. 

अलिबागमधीच बिग बींची ही नवी खरेदी पाहता आता किंग खान, विराट कोहली, रणवीर- दीपिका यांच्यामागोमाग तेसुद्धा खऱ्या अर्थानं अलिबागकर झाले असं म्हणायला हरकत नाही. 

FAQ

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच काय खरेदी केली आहे?
अमिताभ बच्चन यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) Phase 2' प्रोजेक्ट अंतर्गत तीन सलग लक्झरी प्लॉट्स खरेदी केले आहेत. 

या प्लॉट्सची किंमत किती आहे आणि कधी नोंदणीकृत झाली?
या तीन प्लॉट्सची एकूण किंमत सुमारे 6.59 कोटी रुपये आहे. प्लॉट 96  (3413 चौरस फूट) साठी 2.35 कोटी, प्लॉट 97 (2810 चौरस फूट) साठी 1.93 कोटी आणि प्लॉट 98 (2734 चौरस फूट) साठी 1.88 कोटी रुपये खर्च झाले. 

स्टॅम्प ड्युटी आणि इतर शुल्क किती भरले गेले?
स्टॅम्प ड्युटीसाठी 39.58 लाख रुपये आणि नोंदणी शुल्कासाठी 90000 रुपये भरले गेले.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More