स्मिता पाटीलच्या बहिणी पाहिल्या का? दिसायला अगदी स्मितासारख्याच! एक डॉक्टर आहे, तर धाकटीही सुंदर आहे.

Smita Patil's Sister's : भिनेत्री स्मिता पाटीलच्या दोन्ही बहिणी त्यांच्या स्वतंत्र करिअरमध्ये यशस्वी आहेत. मोठी बहिण डॉक्टर आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

Intern | Updated: Oct 8, 2025, 02:21 PM IST
स्मिता पाटीलच्या बहिणी पाहिल्या का? दिसायला अगदी स्मितासारख्याच! एक डॉक्टर आहे, तर धाकटीही सुंदर आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गजरलेल्या अभिनेत्री स्मिता पाटील आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या अभिनयाची गहनता, सौंदर्य आणि व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भुरळ घालणारे होते. स्मिता पाटील यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या सिनेमातून पदार्पण केले. 1980च्या दशकात त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळम, बंगाली आणि कन्नड या भाषांमध्ये काम केले असून जवळपास 80 सिनेमांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची स्ट्राँग आणि हुशार बाजू त्यांना इतर कलाकारांपासून वेगळे ठरवत होती. त्यांच्या अभिनयशैलीने आणि व्यक्तिमत्वाने समाजात आणि सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, अल्पायुषी असलेल्या स्मिताचा 1986 साली फक्त 31 व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये मोठा शोककळा पसरली. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणातील महत्त्वाचे नाव होते, तर आई विद्याताई सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. बालपणापासूनच स्मिताला कला आणि सामाजिक कामाची प्रेरणा मिळाली होती. स्मिता पाटीलच्या बहिणींबद्दल बोलायचे झाले, तर मान्या पाटील सेठ आणि अनिता पाटील देशमुख या दोघी बहिणी आहेत. तिघी बहिणींचा एकमेकांवर खूप जीव होता आणि स्मिताच्या निधनानंतर या दोन्ही बहिणींना मोठा धक्का बसला होता.

Add Zee News as a Preferred Source

अनिता पाटील ही स्मिताची मोठी बहिण असून त्या नवजात शिशु तज्ज्ञ आहेत. बर्याच वर्षा त्यांनी अमेरिकेत वास्तव्यास राहून वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. भारतात परत आल्यावर त्या ‘पुकार’ या सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या आणि तिथे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. अनिताने आपल्या बहिणीच्या आठवणीत आपल्या एका नातीचं नाव स्मिता ठेवले आहे, जे त्यांच्या भावनिक बांधणीचं प्रतीक आहे. धाकटी बहिण मान्या पाटील सेठ सिनेसृष्टीत कॉस्च्युम डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. त्या स्मिता पाटील फाउंडेशनच्या कामातही सक्रिय आहेत आणि स्मिताच्या आठवणींना जिवंत ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. स्मिता पाटील आणि त्यांच्या बहिणींचा प्रवास त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. त्यांच्या कलेचा वारसा आणि बहिणींच्या सामाजिक, वैद्यकीय आणि सर्जनशील कामगिरीमुळे स्मिताच्या आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.

FAQ

स्मिता पाटीलच्या बहिणी कोण आहेत?

स्मिता पाटीलच्या बहिणी मान्या पाटील सेठ आणि अनिता पाटील देशमुख आहेत.

अनिता पाटील काय काम करतात?

अनिता पाटील वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ आहेत आणि नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. तसेच त्या पुकार या सामाजिक संस्थेशी जोडल्या आहेत.

मान्या पाटील सेठ कोणत्या क्षेत्रात काम करतात?

मान्या पाटील सेठ सिनेसृष्टीत कॉस्च्युम डिझायनर आहेत आणि स्मिता पाटील फाउंडेशनच्या कामात सक्रिय आहेत.

About the Author