मुंबई : बॉलिवूडमध्ये कॅबरे आणि आयटम डान्सचा ट्रेंड सुरू करणारी अभिनेत्री हेलन 21 नोव्हेंबर म्हणजे आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. हेलन यांच पूर्ण नाव हेलन रिचर्डसन. हेलन यांचे वडिल म्यानमारच्या सेनेत होते एका यु्द्धा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हेलनची आई मुलांसोबत भारतात आली. पैशांची कमी असल्यामुळे हेलनने डान्स करण्यास सुरूवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलन यांनी सलमान खानचे वडिल सलीम खान यांच्यासोबत 1980 मध्ये लग्न केलं. हेलन या सलीम खान यांची दुसरी पत्नी असून तर सलीम खान देखील हेलन यांचे दुसरे पती होते. हेलेन यांनी 1957 मध्ये दिग्दर्शक पी एन अरोरासोबत लग्न केलं. 


हेलेन यांच हे नातं अतिशय कटू आठवणींनी भरलेलं आहे. अरोरा आणि हेलन यांच्यात भरपूर वाद होत असे. हेलेन यांच्या पहिल्या नवऱ्याने त्यांचे सगळे अकाऊंट आपल्या हातात घेतले. हेलेन यांच्याकडील सगळे पैसे संपले, घर देखील जप्त झालं. 18 वर्षांनंतर हेलेन यांच हे लग्न मोडलं. 


हेलेन पहिलं लग्न मोडल्यामुळे अतिशय दुःखी होत्या. त्या काळात त्यांना काम देखील मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हाच त्यांना सलीम खान यांचा आधार मिळाला. हेलेन आणि सलीम यांची पहिली ओळख काबिल खानच्या सेटवर झाली. 


सलीम खान यांच लग्न सुशीला चरक उर्फ सलमा खान यांच्याशी झालं. त्यांना तीन मुलगे सलमान, अरबाज आणि सोहेल आणि एक मुलगी अलविरी आहे. असं असताना देखील सलीम खान यांनी हेलेन यांच्याशी लग्न केलं. या लग्नाला तिन्ही मुलांचा विरोध होतो. 


सलमा खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हेलेन आणि सलीम यांच्या लग्नामुळे मी खूप निराश झाली होती. त्यावेळी हेलेनशी ही तिन्ही मुलं बोलत नसे. पण हळूहळू या तिन्ही भावांनी हेलन यांना स्विकारलं.