१०८ देशांवर अशी भारी पडली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर
तब्बल १७ वर्षांनंतर `मिस वर्ल्ड` हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.
मुंबई : तब्बल १७ वर्षांनंतर 'मिस वर्ल्ड' हा सौंदर्यवतींचा मानाचा मुकूट भारताने पटकवला आहे.
१०८ सुंदरींमधून निवड
हरियाणाच्या मानुषी छिल्लर या २० वर्षीय युवतीने मिस वर्ल्ड हा किताब पटकवला आहे. चीनमध्ये या सोहळ्याची अंतिम फेरी रंगली. तब्बल १०८ सुंदरींमधून मानुषी छिल्लरची निवड झाली.
एका उत्तराने जिंकल मन
मिस वर्ल्डच्या शेवटच्या पाच स्पर्धांमध्ये सहभागी होण्याआधी मानुषी असा प्रश्न विचारला होता की, कोणत्या व्यवसायाला सर्वाधिक वेतन मिळण्याचा अधिकार आहे ? यावरचं तिचं उत्तर खूप सुंदर होतं.
उत्तर देतांना तिने म्हटलं की, 'आईला सर्वाधिक आदराचा हक्क आहे. गोष्ट फक्त पैशांची नसते. माझं मत आहे की प्रेम आणि सन्मानाची गोष्ट असते. जे तुम्ही कोणाला तरी देता. माझी आई माझ्यासाठी सर्वाधिक प्रेरणास्थान आहे. सगळ्याच आई आपल्या मुलांसाठी त्याग करतात. त्यामुले सर्वाधिक वेतनाच्या त्या हक्कादार आहेत.'
सगळं सांभाळून मिळवलं यश
वैद्यकीय अभ्यास करत असतांना मिस इंडियासाठी मानुषीची निवड केली गेली. आपल्या खाण्याच्या सवयीपासून आपल्या शरीराचा लूक, डॉक्टरकीचा अभ्यास आणि क्लासेस सगळं सांभाळून तिने हा खिताब मिळवला. तिच्या आयुष्यात ती खूपच डिसिप्लीन आहे.