Maithili Thakur Net Worth: मैथिली एका शोचे किती रुपये घेते? शिक्षण, नेटवर्थ किती? सेलिब्रिटींनाही टाकते मागे...

Maithili thakur Education Networth: गरीबीतून उभी राहिलेली 25 वर्षीय कलाकार मैथिली आज करोडोंची मालकीण आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 7, 2025, 07:36 PM IST
Maithili Thakur Net Worth: मैथिली एका शोचे किती रुपये घेते? शिक्षण, नेटवर्थ किती? सेलिब्रिटींनाही टाकते मागे...
मैथिली ठाकूर

Maithili thakur Education Networth: बिहारची युवा लोकगायिका मैथिली ठाकुरचे नाव सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याच्या चर्चा सुरुयत. मैथिली आपल्या गायकीमुळे कायम हेडलाइन्समध्ये असते. गरीबीतून उभी राहिलेली 25 वर्षीय कलाकार मैथिली आज करोडोंची मालकीण आहे. तिला 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'सारख्या सन्मानांनीही त्यांना गौरविले गेलंय. मैथिली कितवी शिकलीय? ती एका शोचे किती रुपये घेते? तिचे नेटवर्थ किती आहे? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

किती संपत्तीची मालकीण? 

कष्ट आणि प्रतिभेच्या बळावर मैथिलीने फार कमी काळात हे यश मिळवलंय. ती एका कार्यक्रमासाठी 5 ते 7 लाख रुपयांची फी घेते. तसेच दरमहा सरासरी 12 ते 15 शो करते, ज्यामुळे तिची कमाई कोट्यवधींमध्ये पोहोचते. 2025 पर्यंतच्या नव्या अहवालांनुसार तिची वार्षिक कमाई 46 ते 64 कोटी रुपयांपर्यंत (अमेरिकन डॉलरमध्ये 558826 ते 767520) असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, सोशल मीडिया पोस्ट्समधूनही तिला महिन्याला 50 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते, ज्यामुळे तिचे आर्थिक साम्राज्य वाढलंय.

सोशल मीडिया आणि ब्रँड प्रमोशन

मैथिलींची कमाईचा प्रमुख स्रोत केवळ स्टेज शो नव्हे, तर डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. 2018 मध्ये सुरू केलेल्या युट्यूब चॅनेलवर 51 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून तिला भजन-लोकगीतांच्या व्हिडिओंमधून मोठी लोकप्रियता मिळालीय. इन्स्टाग्रामवरही लाखो फॉलोअर्स असलेली मैथिली विविध ब्रँड्ससाठी एंडोर्समेंट करते, ज्यामुळे अतिरिक्त करोडो कमावते. तिचे दोन भावांसोबतचे व्हिडिओ व्हायरल होतात.

कितवी शिकलीय? 

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावी जन्मलेल्या मैथिलीचे प्राथमिक शाळा तिथेच झाली. दिल्लीत आल्यानंतर बाल भवन इंटरनॅशनल स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाली. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. संगीताबरोबरच शिक्षणाला प्राधान्य दिल्याने त्यांचे यश अधिक प्रेरणादायी ठरते.

मैथिलीची पॉलिटीकल एन्ट्री?

मैथिलींच्या कलेचे कौतुक करून निवडणूक आयोगाने तिना बिहारचे 'स्टेट आयकॉन' नेमले. 8 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'ने तिला सन्मानित केले.ती आता 2025 च्या बिहार निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उभे राहण्याच्या चर्चा जोरात आहेत, ज्यामुळे तिचे भविष्य आणखी रोमांचक दिसतंय.

FAQ

प्रश्न: मैथिली ठाकुर यांची एकूण संपत्ती आणि कमाईचे स्रोत कोणते आहेत?

उत्तर: माध्यमांतील अहवालांनुसार, मैथिली ठाकुर यांची नेट वर्थ १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्या एका स्टेज शोसाठी ५ ते ७ लाख रुपये आकारतात आणि दरमहा १२ ते १५ शो करतात, ज्यामुळे त्यांची मासिक कमाई कोट्यवधींमध्ये पोहोचते. याशिवाय, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरून महिन्याला ५० लाखांपर्यंत आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई होते.

प्रश्न: मैथिली ठाकुर यांचे शिक्षण आणि त्यांना मिळालेले सन्मान कोणते आहेत?

उत्तर: मैथिली यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावात प्राथमिक शिक्षण घेतले. दिल्लीतील बाल भवन इंटरनॅशनल स्कूलमधून १२वी उत्तीर्ण झाल्या आणि दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांना निवडणूक आयोगाने बिहारचे 'स्टेट आयकॉन' नेमले, तसेच ८ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'ने सन्मानित केले.

प्रश्न: मैथिली ठाकुर यांच्या सोशल मीडिया उपस्थिती आणि राजकीय चर्चांबाबत काय माहिती आहे?

उत्तर: मैथिली यांचे युट्यूब चॅनेल २०१८ मध्ये सुरू झाले असून, त्यावर ५१ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सध्या २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या भाजपच्या तिकिटावर उभे राहण्याच्या अफवा चर्चेत आहेत, ज्यामुळे त्यांचे नाव राजकीय वर्तुळातही गाजत आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More