हृतिक रोशननं Ex पत्नी सुझैनसाठी केलेली ती पोस्ट पाहताच नेटकरी का म्हणाले Divorce Goal?

Hrithik Roshan Ex Wife Sussanne : हृतिक रोशननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 16, 2025, 08:11 AM IST
हृतिक रोशननं Ex पत्नी सुझैनसाठी केलेली ती पोस्ट पाहताच नेटकरी का म्हणाले Divorce Goal?
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan Ex Wife Sussanne : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन ही नेहमीच चर्चेत असते. हृतिक रोशन आणि सुझैननं 2014 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. घटस्फोट झाला असला तरी देखील हृतिक रोशन आणि सुझैन खान हे चांगले मित्र आहेत. तर हृतिक रोशननं त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैनसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यावर सुझैनच्या स्वप्नांविषयी तो बोलताना दिसला आहे. 

सुझैन खान एक इंटेरिअर डिझानयनर आहे आणि तिच्या करिअरमध्ये तिनं तिला जे आयुष्यात करायचं होतं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं आहे. सुझैननं हैदराबादमध्ये तिचं दुसरं चारकोल प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. हृतिकनं त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं केलेल्या या चांगल्या कामगिरीचं कौतूक करत एक पोस्ट शेअर केली आहे. हृतिकनं लिहिलं की 'सुझैन तुझ्यावर मला खूप गर्व आहे. स्वप्न सत्यात उतरत तेव्हा. मला आठवण आहे 20 वर्षांपूर्वी तू असं काही करण्याचा विचार करत होती. आज जेव्हा हैदराबादमध्ये दुसरा चारकोल प्रोजेक्ट लॉन्च करत आहेत. तेव्हा मी या छोट्या मुलीचं कौतूक करण्याशिवाय काही करू शकत नाही, कारण तिनं खूप वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

हृतिक रोशनच्या या पोस्टवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, या दोघांचा घटस्फोट का झाला आणि त्यासोबत रडण्याचं इमोजी देखील त्यानं वापरलं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, घटस्फोट गोल्स. अर्थात घटस्फोट झाल्यानंतरही इतकी चांगली मैत्री हवी. तिसरा नेटकरी म्हणाला, भाऊ अजूनही हिच्यावर प्रेम करतो. अनेकांनी कमेंट करत हृतिकची स्तुती केली आहे.

हेही वाचा : 'सलमान मला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून गेला...', अभिनेत्याने सांगितला सलमानबाबतचा धक्कादायक अनुभव, 'बालिशपणे...'

हृतिक रोशन आणि सुझैन खानविषयी बोलायचं झालं तर दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं होतं. 14 वर्षांच्या लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर सुझैन आणि हृतिकनं 2014 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. आज त्या दोघांच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती असली तरी सुद्धा त्यांच्यात चांगली मैत्री आहे.