'मी अगदी टिपिकल स्त्री आहे' स्वयंपाक आणि देवपूजेबद्दल रिंकू राजगुरूचा खुलासा; म्हणाली...

रिंकूने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत घरकाम आणि वैयक्तिक आयुष्याबाबत काही खास गोष्टी शेअर केल्या, ज्यामुळे ती पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आली आहे.

Intern | Updated: Oct 15, 2025, 08:25 PM IST
'मी अगदी टिपिकल स्त्री आहे' स्वयंपाक आणि देवपूजेबद्दल रिंकू राजगुरूचा खुलासा; म्हणाली...

'सैराट' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आजही मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपले स्थान दृढ करत आहे. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर खास ठसा उमटवला आहे आणि लवकरच ती प्रत्येक नवीन प्रोजेक्टसह चर्चेत राहते. नुकतीच 'लोकमत फिल्मी'शी झालेल्या मुलाखतीत रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, घरकाम आणि स्वयंपाकाशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मुलाखतीत रिंकूने स्वतःबद्दल सांगताना म्हटले 'मी टिपिकल बाईसारखी आहे. माझी देवपूजा मी करते, माझा स्वयंपाक मी करते. मला घर स्वच्छ आणि नीट ठेवायला आवडतं.' कामाच्या व्यग्रतेमुळे रोज घराची सगळी कामे करणे शक्य नसते, तरी स्वयंपाक तिला स्वतःच्या हाताने करण्याची खूप आवड आहे. तिने पुढे स्पष्ट केले, 'एवढं रोज होत नाही. काही कामासाठी आमच्याकडे माझ्या ताई येतात, पण स्वयंपाक मला कोणाच्या हाताचा आवडत नाही.' तिने बनवता येणाऱ्या पदार्थांविषयीही खुलासा केला, 'नॉनव्हेज सोडून सगळं बनवता येतं. मी भाकरी छान करतो, पिठलं छान करते. पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात. जेवण मला सोप्पं आहे, काहीही अवघड नाही.'

रिंकूचा हा टिपिकल भारतीय अंदाज आणि साधेपणा चाहत्यांना खूप भावतो. अभिनयासोबतच घराची जबाबदारी सांभाळणारी आणि स्वतःच्या आवडीत वेळ घालवणारी रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. चाहत्यांना ती नेहमीच तिच्या नवीन प्रोजेक्टसह वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट्स देते, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्याविषयीची उत्सुकता कायम राहते. 'सैराट'नंतर रिंकूने ‘कागर’, ‘झिम्मा 2’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला असून ‘झुंड’ आणि ‘200 हल्ला हो’ यांसारख्या सिनेमांमध्येही ती दिसली आहे.

रिंकूच्या अभिनयासोबतच घरकाम आणि पारंपरिक आवडीची साधेपणाची छटा चाहत्यांना विशेष भावते. अभिनेत्रीच्या या अंगाने ती फक्त एक कलाकार नसून, आपल्या जीवनात साधेपणा आणि संस्कार जपणारी एक व्यक्ती असल्याचेही दिसून येते. तिचा हा ‘टिपिकल भारतीय’ अंदाज चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे ती नेहमीच लक्ष वेधून घेते. अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देणारी, साधेपणा राखणारी आणि चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर करणारी रिंकू राजगुरू ही आपल्या कारकिर्दीत एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.

FAQ
रिंकू राजगुरू घरकाम आणि स्वयंपाकाबाबत काय सांगितले?
रिंकूने म्हटले की, ती टिपिकल भारतीय बाईसारखी आहे, तिला घरकाम आणि देवपूजा करण्याची आवड आहे. ती स्वतः स्वयंपाक करते आणि घर स्वच्छ ठेवायला प्राधान्य देते.

रिंकूला दुसऱ्याच्या हाताचा स्वयंपाक आवडतो का?
नाही. तिने स्पष्ट केले की, काही कामांसाठी ताई येतात, पण स्वयंपाक तिला कोणाच्या हाताचा खायला आवडत नाही. ती स्वतःच पदार्थ बनवायला प्राधान्य देते.

रिंकू राजगुरूने अभिनयाच्या क्षेत्रात कोणते प्रमुख प्रोजेक्ट केले आहेत?
‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकूने ‘कागर’, ‘झिम्मा 2’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे, जसे की ‘झुंड’ आणि ‘२०० हल्ला हो’.

About the Author