'रडायला रुमाल हवा' रत्ना पाठक शाह यांना भावूक केलं या मराठी नाटकने !

Ratna Pathak Shah cries watching Marathi Natak : बॉलिवूडमध्ये अनुपम खेरच्या नंतर, आता रत्ना पाठक शाह मराठी रंगभूमीवरील नाटक पाहून भावूक झाल्या.   

कावेरी पिंपळे | Updated: Nov 14, 2025, 01:16 PM IST
'रडायला रुमाल हवा' रत्ना पाठक शाह यांना भावूक केलं या मराठी नाटकने !

मराठी रंगभूमी गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट विषय आणि आशयाच्या नाटकांनी समृद्ध राहिली आहे. मराठी सिनेमापेक्षा प्रेक्षक मराठी नाटकांना जास्त प्रतिसाद देताना दिसत आहेत. सध्या अनेक मराठी कलाकार जाणीवपूर्वक रंगभूमीवर काम करत आहेत. मराठी रंगभूमीचा दर्जा आणि स्थान पहिल्यापासून अढळ आहे आणि आजही ते स्थान कायम टिकवून ठेवले आहे. केवळ मराठीच नाही तर अन्य राज्यांतील प्रेक्षकही मराठी नाटकांचा आदर करतात.

Add Zee News as a Preferred Source

काही महिन्यांपूर्वी, प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेरही भावूक झाले होते. त्यांनी नाटक आणि त्यातील कलाकारांचा खुलेपणाने कौतुक केले. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह ही मराठी नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली. नाटक पाहिल्यानंतर तीही भावूक झाल्या आणि नाटक, कलाकार व मराठी नाट्यसृष्टीचे कौतुक करत त्यांनी सांगितले 'जाताना दोन-तीन रुमाल सोबत ठेवा, खूप रडायला येतं.'

रत्ना पाठक शाहचे मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीवरील प्रेम लपून राहिलेले नाही. त्या उत्तम मराठी बोलतात आणि अनेक मराठी नाटकांना आवर्जून हजेरी लावतात. नुकताच त्या ‘असेन मी नसेन मी’ या मराठी नाटकाला हजेरी लावण्यासाठी गेल्या होत्या.

नाटकाची कहाणी आणि प्रतिक्रिया

‘असेन मी नसेन मी’ नाटकात डिमेन्शिया, अल्झायमर आणि वृद्धत्वाशी संबंधित विषय हाताळला आहे, जो प्रत्येक कुटुंबासाठी स्पर्शून जाणारा आहे. रत्ना पाठक शाह म्हणाल्या 'हे नाटक मनाला स्पर्शून गेलं. कारण ही परिस्थिती आपल्या आयुष्याचा भाग आहे. कधीकधी आपण याकडे कानाडोळा करतो, पण नाटक हे सत्य समजून घेण्यास मदत करतं.' अभिनेत्री म्हणाल्या की, नेहमीच्या जीवनातील संवेदनशील विषय या नाटकाने प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांनी कलाकारांचे विशेष कौतुक केले 'सुंदर परफॉर्मन्सेस नीना, राणी सुंदर... आणि राणी (शुभांगी गोखले) नक्की बघा. विचार करायला भाग पाडेल. जाताना 2-4 रुमाल सोबत घेऊन जा, खूप रडायला येतं.'

नाटकाचे पुरस्कार आणि कलाकार

‘असेन मी नसेन मी’ नाटकात नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाने आतापर्यंत 22 पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात महाराष्ट्र शासनाचे 8 पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषद 4 पारितोषिके आणि मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांचा समावेश आहे. मराठी रंगभूमीवर अशा नाटकांमुळे प्रेक्षकांना भावनिक अनुभव, सामाजिक संदेश आणि उत्तम अभिनय मिळत राहतो, आणि बॉलिवूड कलाकारांनाही मराठी नाट्यसृष्टीवर प्रेम वाढवण्याची संधी मिळते.

FAQ
रत्ना पाठक शाह कोणते मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या?
रत्ना पाठक शाह ‘असेन मी नसेन मी’ हे मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या.

या नाटकाचा विषय काय आहे आणि का भावूक केले?
नाटकात डिमेन्शिया, अल्झायमर आणि वृद्धत्व यांसारख्या संवेदनशील विषयांचा परिचय दिला आहे. नाटकातली कथा आणि कलाकारांचे परफॉर्मन्स रत्ना पाठक शाहला भावूक करून ठेवले.

‘असेन मी नसेन मी’ नाटकाचे पुरस्कार आणि प्रमुख कलाकार कोण आहेत?
या नाटकाने आतापर्यंत 22 पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात महाराष्ट्र शासनाचे 8 पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषद 4 पारितोषिके, आणि मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांचा समावेश आहे. प्रमुख कलाकार आहेत नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More