Riteish Deshmukh On Raid At Akshay Kumar Home: 'रेड टू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश देशमुखने एका रॅपीड फायर राऊंडमध्ये एक रंजक विधान केलं आहे. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींच्या नावांची यादी वाचून तुला त्यांच्या घरातील कोणत्या गोष्टी छापा मारल्यावर सापडतील किंवा कोणत्या गोष्टी छाप्यात साडल्या तर घेऊन जायला आवडेल असं रितेशला विचारण्यात आलं. त्यावर रितेशने दिलेली उत्तरं फारच रंजक होती.
'रेड टू'मध्ये ज्याच्यासोबत काम केलं त्या अजय देवगणच्या घरात छापा मारल्यावर त्याच्या घरात केवळ औषधं सापडतील असं सांगितलं. तसेच शाहरुख खानच्या घरावर छापा मारल्यावर त्याच्या घरातील लायब्रेरीवर आपली नजर असेल असं रितेशने सांगितलं. तसेच सलमान खानच्या घरात छापा टाकला तर सराकात्मकता, खाद्यपदार्थ यासारख्या गोष्टीच तुम्हाला आढळून येतील असं रितेश म्हणाला.
"सलमानचं संपूर्ण कुटुंब पाहुणचारामध्ये अव्वल आहे. अगदी सलमान भाईपासून सलीम काकांपासून ते अर्पिता सारे आपुलकीने स्वागत करतात," असं रितेशने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पुढे रितेशने त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी अक्षय कुमारसंदर्भात एक रंजक विधान केलं आहे. 'हे बेबी'पासून ते अगदी 'हाऊसफूल'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अक्षयबरोबर काम केलेल्या रितेशने अक्षयच्या घरी कधी छापा टाकता येईल याबद्दलची माहिती दिली आहे.
"तुम्हाला अक्षय कुमारच्या घरी छापा मारायचा असेल तर पहाटे चार वाजता छापा मारा. तो वेळ उत्तम ठरेल. जो कोणी छापा मारायला जाईल त्याच्यावरच छापा पडेल. कारण तो सर्वांना व्यायाम करायला लावेल," असं रितेशने अक्षयच्या घरावर छापा टाकण्यासंदर्भात म्हटलं. अक्षयचं आरोग्यासंदर्भात सतर्क राहण्याची सवय ही खरोखरच कौतुकास्पद आहे असं यामधून रितेशला सुचवायचं होतं. छाप्यात ही सवय आपल्याला घेऊन जायला आवडेल असं रितेशने सूचित केलं.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अक्षय कुमारने तो व्यायामाबद्दल किती सतर्क आहे हे सांगितलं आहे. काही आठवड्यांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने, "माझ्या प्रकृतीवर परिणाम होत असेल तर मी स्वत:वर दबाव टाकत नाही. मला वाटतं की ज्याची प्रकृती उत्तम तो सर्वात श्रीमंत. खरं तर प्रत्येक व्यक्तीने असाच विचार केला पाहिजे," असं म्हटलं.
अक्षयसोबत काम केलेला अभिनेता मनोज पहावाने त्याच्यासोबत व्यायम करण्याचा अनुभव शेअर केलेला. "संध्याकाळी पावणेआठ वाजता त्याचा ट्रेनर त्याचं खाणं घेऊन यायचा. साडेआठच्या सुमारास तो निघून जायचा. तो साडेनऊपर्यंत झोपायचा. तो पहाटे चार वाजता उठतो आणि दोन ते अडीच तास व्यायाम करतो. हे वाटतं तितकं सोपं नाही. मला खरोखर यातून शिकायला मिळालं," असं मनोजने म्हटलेलं.