VIDEO : ‘परदेसिया’ ते ‘पिया तोसे नैना लागे रे’ पर्यंत आयफा 2024 मध्ये रेखा यांचा धमाकेदार परफॉर्मन्स
IIFA 2024 Rekha Video : आयफा 2024 मधील रेखा यांच्या डान्स परफॉर्मन्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...
IIFA 2024 Rekha Video : बॉलिवूडच्या लोकप्रिय दिग्गज अभिनेत्री रेखा आज चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी देखील ते कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसतात. त्या जेव्हा केव्हा कार्यक्रमांमध्ये दिसतात तेव्हा सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगते. आजही त्यांचे चाहते पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यात जर त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलं तर चाहत्यांची चांदीच चांदी असते असं म्हणता येईल. अशात अबू धाबीमध्ये नुकताच आयफा 2024 कार्यक्रम झाला. त्यावेळी रेखा यांनी धमाकेदार परफॉर्मन्स केला. रेखा यांनी त्यांच्या डान्स मुव्ह्सनं सगळ्यांचे लक्ष वेधले.
आयफा 2024 मधील रेखा यांच्या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात क्वीन ऑफ रोमांस रेखा या परदेसिया या गाण्यावर आणि त्यानंतर पिया तोसे नैना लागे रे या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. त्यात त्यांचे एक्सप्रेशन, डान्स मूव्स आणि त्यांचा साधेपणा दिसून येत आहे. रेखा यांच्या परफॉर्मन्सनं सगळ्यांचे लक्ष वेधले. रेखा या 69 वयाच्या असूनही इतक्या ग्रेसफूली डान्स करत आहेत हे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. इतकंच नाही तर सगळ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
IIFA 2024 अवॉर्ड सेरमनीममध्ये रेखा यांना घेऊन अशी माहिती समोर आली होती की त्यात 22 मिनिटांचा परफॉर्मेन्स करणार आहेत. त्याची चाहती आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. त्यांच्यासोबत बॅकग्राऊंडला 150 बॅक ग्राऊंड डान्सर्स देखील सहभागी होती. अशात चाहत्यांची प्रतीक्षा संपली आणि अखेर रेखा यांच्या परफॉर्मेन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातून सगळ्या चाहत्यांना त्यांच्या या डान्सची झलक पाहायला मिळाली आहे. त्यात रेखा यांनी गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. रेखा या संपूर्ण लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
हेही वाचा : तिरुपती लाडू वादावर काही बोलण्यास रजनीकांत यांनी दिला नकार! म्हणाले, 'मला...'
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रेखा यांनी आयफामध्ये त्यांच्या परफॉर्मेंसला घेऊन मीडियाशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आयफासाठी त्यांच्या मनात एक खास स्थान आहे. त्यांचं असं मत आहे की हा फक्त भारतीय सिनेमाचा उत्सव नाही तर इंटरनॅशनल स्टेवर आर्ट, कल्चर आणि प्रेम सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. आयफा हे त्यांच्या घरातील कोणत्या कार्यक्रमासारखा आहे असं त्यांनी सांगितलं होतं.