Ileana D’Cruz : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ रुग्णालयात; देतेय गंभीर आजाराशी झुंज

 Ileana D’Cruz Hospitalised : इलियानानं रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या स्थितीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Updated: Jan 31, 2023, 11:54 AM IST
 Ileana D’Cruz  : अभिनेत्री इलियाना डिक्रूझ रुग्णालयात; देतेय गंभीर आजाराशी झुंज title=

Ileana D’Cruz Hospitalised​ : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझचे (Ileana DCruz) स्टाइल स्टेटमेंट क्लासिक, ग्लॅमरस आणि ट्रेंडी असतं. नेहमी आपल्या कूल फॅशनमुळे चर्चेत असलेली इलियाना आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून इलियाना आजारी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अभिनेत्रीनं सोशल मीडियावरून तिच्या तब्येतीची माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. इलियानानं रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या स्थितीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  ते फोटो पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये एलियानाचा खूपच आजारी दिसत आहे. तसंच एका फोटोमध्ये तिच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे. हे फोटो शेअर करत इलियानानं लिहिलं आहे की, 'एका दिवसात खूप काही बदलू शकतं... काही प्रेमळ डॉक्टर आणि सलाईनच्या तीन बॅगा आहेत.' 

''ज्यांनी ज्यांनी माझ्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी मला मेसेज केले त्या सगळ्यांचे आभार. तुम्हा सर्वांचे प्रेम मिळाल्यानं मी भारावून गेले आहेत. मी आता ठीक आहे. योग्यवेळी मला वैद्यकीय मदत मिळाल्यानं माझी प्रकृती सुधारत आहे.'

दरम्यान, 2017 मध्ये एका मुलाखतीमध्ये इलियानानं सांगितलं होतं की, तिलाबॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर या आजारानं ग्रासली होती. यामुळे ती अत्यंत निराश झाली होती आणि त्यातूनच ती आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली होती. परंतु यातून तिनं स्वतःला सावरलं.

Ileana D’Cruz Hospitalised

तज्ञांच्या मते, या अवस्थेत रुग्णाला आपल्या संपूर्ण चेह-यासहित पूर्ण शरीराची बनावट जसं की नाक, डोळे, केस, हनुवटी, त्वचा आणि ओठ किंवा इतर खाजगी अवयव जसे की स्तन, खाजगी भाग (जननेंद्रियाचा अवयव) हे अवयव खूप लठ्ठ किंवा बारीक असल्याची जाणीव होत असल्याने आपल्यात शरीराबाबत खूप अस्वस्थ वाटू लागतं. इतकंच नव्हे तर त्याला स्वतःला आरशात बघण्याची लाज वाटू लागते.

डिस्मॉर्फिया किती धोकादायक असतो?
तज्ञांच्या मते, शरीरातील डिसमॉर्फिक डिसऑर्डर हा आजार सहसा स्वतःहून बरा होत नाही किंवा जात नाही. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला पुढे काही गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल. या स्थितीत, कधी कधी रुग्ण जास्त चिंता आणि तणावामुळे नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशनचा बळी ठरू शकतो, एवढेच नाही तर त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार देखील येऊ शकतो.