राज कुंद्राचा पाय आणखी खोलात, आता आणखी एका मॉडेलने सोडलं मौन

या मॉडेलनं राज कुंद्राच्या हॉटशॉट्स या अॅपसाठी तिला ही न्यूज शूट करण्यासाठी विचारण्यात आल्याचं म्हटलं आहे.   

Updated: Jul 25, 2021, 05:47 PM IST
राज कुंद्राचा पाय आणखी खोलात, आता आणखी एका मॉडेलने सोडलं मौन

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra ) याच्या पॉर्नफिल्म प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूनम पांडे (Poonam Pandey) आणि सागरिका शोना (Sagarika Shona) या मॉडेल्सने आतापर्यंत राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.  या प्रकरणात आणखी एका मॉडेलचं नावं जोडलं जात आहे. 

या  मॉडेलनं राज कुंद्राच्या हॉटशॉट्स या अॅपसाठी तिला ही न्यूज शूट करण्यासाठी विचारण्यात आल्याचं म्हटलं आहे. या मॉडेलचं नाव निकिता फ्लोरा सिंह (Nikita Flora Singh) असं आहे. राज कुंद्राचा पर्सनल असिस्टेंट उमेश कामत याने  निकिताला ही ऑफर दिली होती. ट्विट करत निकिताने याबाबतचा खुलासा केला आहे.

निकिताकडून ट्विट करत माहिती

निकिता फ्लोरा सिंगने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "मला देखील नोव्हेंबर 2020 मध्ये राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅपसाठी न्यूड शूट करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. पण मी त्यांना नकार दिला होता. उमेश कामतने मला प्रत्येक दिवसासाठी 25 हजार रुपये दिले जातील असं सांगितलं होतं,

मॉडेलने सोडलं मौन

देवाची कृपा की मी ही ऑफर स्विकारली नाही. राज कुंद्रासारख्या मोठया नावाच्या नादात मी फसले नाही.