Pawandeep आणि Arunita चा रोमँटिक डान्स, व्हीडिओ व्हायरल

इंडियन आयडल  (indian idol 12)  या लोकप्रिय शोच्या माध्यमातून पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) घराघरात पोहचले. 

Updated: Sep 23, 2021, 08:15 PM IST
Pawandeep आणि Arunita चा रोमँटिक डान्स, व्हीडिओ व्हायरल

मुंबई :  इंडियन आयडल  (indian idol 12)  या लोकप्रिय शोच्या माध्यमातून पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल घराघरात पोहचले. पवनदीप या 12 व्या मोसमातील विजेता ठरला. अरुणिताही उपविजेता ठरली. ही जोडी सध्या विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर धमाल करतायेत. या दोघांचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. (indian idol 12 winner Pawandeep Rajan and runnerup Arunita Kanjilal romanctic dance on song of Raataan Lambiyan video viral)

या व्हीडिओत अरुणिता आणि पवनदीप सिद्दार्थ मल्होत्राच्या Raataan Lambiyan या गाण्यावर रोमॅन्टिक डान्स करतायेत. हा व्हीडिओ नेटीझन्सच्या पसंतीस पडला आहे. 

पवनदीपने हा व्हीडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हीडिओत दोघेही रोमॅन्टिक दिसतायेत. पवनदीपने या व्हीडिओत ब्लू शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली आहे. तर अरुणिताने काळा कुर्ता घातला आहे. हे दोघेही सुंदर दिसतायेत.  

या दोघांनी इंडियन आयडल या रियालिटी कार्यक्रमात प्रेक्षकाचं भरभरुन मनोरंजन केलं. आपल्या सुंदर आवाजाने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता कार्यक्रम संपला असता तरी दोघेही कायम विविध कारणांमुळे चर्चेत असतात.