Gauri Khan Restaurant Fake Paneer : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं मुंबईत टोरी हे रेस्टॉरंट सुरु केलं असून इथे नेहमीच गर्दी असल्याचं पाहायला मिळतं. इथे नेहमीच तुम्हाला सेलिब्रिटी पाहायला मिळत असेल. पण आता हे रेस्टॉरंट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गौरीच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर मिळालं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं रेस्टॉरंटमधील पनीरला बनावट असल्याचं म्हटलं आहे. इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर सार्थक सचदेवानं टोरीमध्ये जाऊन सगळं काही समोर पाहिलं आहे.
सार्थक सचदेवानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं आरोप केला आहे की त्याच्या टेस्टनुसार, रेस्टॉरंटमध्ये स्टार्चनं बनवलेलं पनीर त्याला जेवणासाठी वाढलं होतं. त्यानं जी टेस्ट केली त्यावरून बनावट पनीर हे ओळखता येतं. व्हिडीओमध्ये सार्थक रेस्टॉरंटमध्ये वाढलेलं पनीरच्या तुकड्याच आयोडीन टिंचर टेस्ट करतो. ही टेस्ट सर्वसामान्यपणे स्टार्चची ओळख करण्यासाठी करण्यात येतो. आयोडीन लावल्यानं पनीर काळं आणि निळं झालं. पनीरचा रंग बदलत असल्याचं पाहता सार्थकनं म्हटलं की 'शाहरुख खानच्या रेस्टॉपंटमध्ये बनावट पनीर होतं. हे पाहून मला मोठा धक्काच बसला.'
व्हिडीओमध्ये सार्थकनं मुंबईमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांच्या इथलं पनीर कसं आहे ते तपासलं. विराट कोहलीच्या वन8 कम्यून, शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन आणि बॉबी देओलच्या समप्लेसमध्ये तो गेला आणि त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पनीरची गुणवत्ता कशी आहे ते तपासलं. त्याच आयोडून टेस्टचा वापर करताना दाखवलं आहे. त्यापैकी कोणत्याही पनीरचा रंग का काळा झाला नाही. त्यामुळे कळलं की त्यात स्टार्च नव्हतं.
सार्थकनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गौरी खानचं रेस्टॉरंट टोरीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत रेस्टॉरंटनं लिहिलं की, 'आयोडीन टेस्ट हे स्टार्च किती आहे ते दाखवतं. पनीर बनावटी आणि आहे की नाही हे दाखवत नाही. आता त्या डिशमध्ये सोया-बेस्ड वस्तू आहेत. त्यामुळे हे सगळं झालं. आम्ही आमच्या पनीरच्या शुद्धतेवर ठाम आहोत.' सार्थनं यावर मस्करी करत म्हटलं की काय आता मला तिथे बॅन करण्यात येणार आहे? पण काही असलं तरी तुमचं जेवणं हे चविष्ट होतं.