आमिर खानची मुलगी Ira Khanचे बॉयफ्रेंड Nupur सोबतचे रोमँन्टिक फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इरा खान (Ira Khan) नुपूर शिखरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती वेळोवेळी चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. नुकताच, नुपूर शिखरने इन्स्टाग्रामवर इरासोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. इराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इरा खान (Ira Khan)च्या चाहत्यांना नुपूरने शेअर केलेला हा फोटो खूप आवडत आहे. फोटोत नुपूर शिखरच्या पाठीवर पडलेली दिसत आहे. याचबरोबर इरा खान (Ira Khan)ने त्याला मागून मिठी मारली आहे. आणि इरा खान (Ira Khan) नुपूरकडे बघत त्याला किस करताना दिसत आहे. नुपूरने पांढरा टी-शर्ट घातला आहे, तर इराने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. इरा खान (Ira Khan) आणि नुपूर एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. या पोस्टला उत्तर देताना इरा म्हणाली, "मी तुझ्यावर प्रेम करते."
इराला अभिनेत्री बनण्याची इच्छा नाही
इराने दोन वर्षांपूर्वी युरीपिड्स मेडिया नावाच्या शोद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. इरा खान (Ira Khan) आणि नुपूर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला इंस्टाग्रामवर त्यांचं नातं अधिकृत केलं. अलीकडेच, हे कपल त्यांच्या सुट्ट्यांसाठी हिमाचलमध्ये पोहोचलं होतं आणि तिथूनच त्यांनी त्यांचे अनेक फोटो त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते.
जुलैमध्ये इरा खान (Ira Khan)ने नुपूरसोबत अनेक फोटो शेअर केले. आणि या फोटोंना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तो इतका ड्रामेबाज आहे की....' आमिरची मुलगी इरा खान (Ira Khan)ला अभिनेत्री बनण्याची इच्छा नाही. तिचा कल दिग्दर्शनाकडे आहे.