'मला बरं होण्यासाठी वेळ हवाय... रक्तानं माखलेल्या...', रडत- रडत बाबिल खान असं का म्हणाला?

Irfan Khan's Son Babil Khan: रडताना काढलेल्या व्हिडिओ नंतर आता बाबिल खानच्या नव्या फोटोने चाहत्यामध्ये खळबळ उडवली आहे. त्या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये एक दुःखद संदेश लिहीला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?   

Updated: Oct 12, 2025, 02:30 PM IST
'मला बरं होण्यासाठी वेळ हवाय... रक्तानं माखलेल्या...', रडत- रडत बाबिल खान असं का म्हणाला?

Irfan Khan's Son Babil Khan: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान याने कॅमेरा असिस्टंट म्हणून सिनेजगतात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 2022 मध्ये "काला" या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2023 मध्ये तो "द रेल्वे मॅन" मध्ये दिसला. लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या बाबिलने "फ्रायडे नाईट प्लॅन्स" मध्येही काम केले. या वर्षी त्याचा "लॉगआउट" हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झाला. तो दिग्दर्शक साई राजेशसोबत एका चित्रपटात काम करत होता, मात्र या प्रवासात त्यानं मधूनच माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. 

Add Zee News as a Preferred Source

व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो रडला आणि बॉलिवूडवर टीका केली. चाहते व्हिडिओ पाहून नाराज झाले. थोड्याच वेळानंतर क्लिप डिलीट करण्यात आली असली तरी ती व्हायरल झाली. बाबिलने बॉलिवूडला "बकवास" आणि "असंस्कृत" म्हटले, अनन्या पांडे आणि अर्जुन कपूर सारख्या स्टार्सची नावे घेतली आणि म्हटले, "आतापर्यंतचा सर्वात बनावट आणि फेक प्रकरणांचा मी भाग झालो."

अभिनेत्याने म्हटले की व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. तो कलाकारांना पाठिंबा देत होता. कलांतराने त्याच्या टीमने सांगितले की तो त्याच्या "लॉगआउट" चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ होता. त्याने चुकून तो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला, म्हणूनच त्याने तो डिलीट केला.

4 महिन्यानंतर सोशल मीडियावर परतला अन् म्हणाला...
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता बाबिल खान 4 महिन्यानंतर सोशल मीडियावर परतला आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्वतःचा फोटो पोस्ट करत, त्यांच्या मानसिक अवस्थेबद्दल उघडपणे सांगितले आहे. तो म्हणाला की, तो डिप्रेशन विरोधात लढत आहेत आणि आतून खूपच दुखी आहेत.  बाबिलने त्याच्या फोटोसोबतच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी ऐकायला तयार नव्हतो. या काचेच्या घराच्या भिंती खूप पातळ आहेत. मी माझे हृदय तळहातावर घेतले आहे. आता माझे टी-शर्ट रक्ताने माखले आहेत. मला बरे होण्यासाठी वेळ हवा होता, माझ्या आत असलेल्या राक्षसांनी खोल जखमा केल्या. मी मदतीसाठी ओरडत होतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो." 

अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) याने त्याच्या पोस्टवर लिहिले, "बाबिल, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. अजिबात काळजी करू नकोस."  त्याच्या अस्वस्थतेचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र तो अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

एकूणच, बाबिल खानचं हे पुनरागमन त्याच्या मानसिक संघर्षाची जाणीव करुन देणारे आहे. त्याने स्वतःची कमकुवत बाजू उघडून दाखवली आहे आणि सांगितले आहे की, या संघर्षात त्याला वेळ आणि मदतीची गरज आहे.

About the Author