रोलसाठी मनोज बाजपेयी आणि दिवंगत अभिनेता इरफान खानमध्ये होती स्पर्धा, या कलाकाराने मारली बाजी
भिखू म्हात्रेच्या भूमिकेमुळे लोकांना मनोजचे वेड लागलं होत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये मनोज बाजपेयी आणि दिवंगत अभिनेता इरफान खान हे दोन असे अभिनेते होते की, त्यांच्या अभिनयाच्या जोरावर निर्मात्यांनी त्यांच्यासाठी खास भूमिका लिहिण्यास सुरवात केली. या दोन्ही कलाकारंनी त्यांच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनांत खास स्थान निर्माण केलं. 2018मध्ये एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी एक किस्सा शेअर केला होता. ज्यात मनोज आणि इरफानमध्ये एका छोट्या भूमिकेसाठी स्पर्धा होती.
सहाय्यक भूमिकेसाठी घेतले होते 35 हजार रुपये
या मुलाखतीत मनोज बाजपेयीने सांगितलं की, निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या 'दौड' या चित्रपटाच्या सहायक भूमिकेसाठी बोलणं सुरु आहे. दिलेल्या एका मुलाखतीत मनोजने सांगितले की, परेश रावल, संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर स्टारर या चित्रपटात यांच्यासोबतच्या भूमिकेसाठी 35000 रुपये मिळणार आहेत.
इरफान आणि विनीतसुद्धा ऑडिशनसाठी आले होते
मनोजच्या म्हणण्यानुसार, इरफान खान आणि विनीत कुमार या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. कन्नन अय्यर यांनी हा चित्रपट लिहिला होता. अय्यर यांनी शेखर कपूरला ''बॅंडिट क्वीन'' मध्ये असिस्ट केलं होतं. अय्यर यांनी सांगितले की, इरफान आणि विनीतसुद्धा या भूमिकेसाठी येत आहेत, मला तुम्हाला देखील बोलावायचं आहे. जर वर्माला तुमची एक्टिंग आवडली. तर त्याच्या पुढच्या चित्रपटात तुला मोठी भूमिका मिळू शकते.
राम गोपाल वर्मा प्रभावित झाले
मनोजने सांगितलं की, जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा इरफान आणि विनीत आधीपासूनच तिथे हजर होते. या दोघांनंतर माझा नंबर आला. मी राम गोपाल वर्मा यांना 'बॅंडिट क्वीन'वाल्या मानसिंहच्या भूमिकेबद्दल सांगितलं. ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की, हा चित्रपट मी दोनदा पाहिला आहे, तुम्ही कोणती भूमिका साकारली आहे? ते म्हणाले की, तू तर खूप लहान दिसत आहेस. मी म्हणालो की, या रोलमध्ये मी दाढी वाढविली आहे. या वक्तव्यावर तो माझ्यावर खूप प्रभावित झाला.
'दौड़' सोड, पुढचा चित्रपट तुझ्यासोबत बनवेन'
रामगोपाल वर्मा यांनी मनोजला सांगितल की, 'दौड़'ला सोडून दे, मी तुमच्याबरोबर पुढचा चित्रपट बनविन' यावर मनोज म्हणाला, 'नाही सर, मलाही ही भूमिका करायची आहे कारण त्यातून मला 35 हजार रुपये मिळतील.' यावर वर्मा म्हणाले की, तुला माझ्यावर विश्वास नाही. मी एका मोठ्या तेलगू चित्रपटावर काम करत आहे. तो लवकरच सुरू करणार आहे. दौड' नंतर मी या चित्रपटावर लक्ष केंद्रित करणार आहे. यानंतर वर्मा यांनी मनोजबरोबर 'सत्या' सिनेमा तयार केला. या सिनेमात भिखू म्हात्रेच्या भूमिकेमुळे लोकांना मनोजचे वेड लागलं.