Babil Khan: इरफान खानच्या मुलाने केली लक्ष वेधून घेणारी पोस्ट! चाहते चर्चेत

Babil Khan Post: बाबिल खानने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बाबिलच्या या पोस्टने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 12, 2025, 03:12 PM IST
Babil Khan: इरफान खानच्या मुलाने केली लक्ष वेधून घेणारी पोस्ट! चाहते चर्चेत

Babil Khan Cryptic Post: दिग्गज अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या भावना उघड करताना दिसला आहे. डिप्रेशनशी सुरू असलेल्या त्याच्या लढाईबद्दल त्याने केलेल्या नव्या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये बाबिलने ‘रक्ताने माखलेला टी-शर्ट’ असा उल्लेख करत आपल्या मनस्थितीबद्दल सांगितलं आहे, ज्यामुळे फॅन्स पुन्हा चिंतेत आले आहेत. इरफान खानचा मुलगा म्हणून ओळखला जाणारा बाबिल अनेकदा चर्चेत राहिला आहे. तो नेहमीच आपल्या भावनिक पोस्ट्समुळे चर्चेत येतो आणि यावेळीही त्याने शेअर केलेल्या दोन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये बाबिलच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट जाणवते. त्याने या फोटोंसोबत लिहिलेला कॅप्शन मात्र अनेकांना विचारात टाकणारा आहे.

Add Zee News as a Preferred Source

‘रक्ताने माखलेला टी-शर्ट…’ बाबिलची वेदनादायक कबुली

लाल रंगाच्या  स्वेटरमध्ये दिसणाऱ्या बाबिलने स्वतःचा क्लोज-अप शेअर करत लिहिलं ‘मी ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हतो. या काचेच्या घराच्या भिंती पातळ आहेत.  मी माझं हृदय पाहिलं तर टी-शर्ट रक्ताने माखलं आहे. मला बरा होण्यासाठी वेळ हवा होता. त्या राक्षसांनी मला खोल जखमा दिल्या. निद्रानाश आणि घबराटीनं मला बोलायला भाग पाडलं.’

हे ही वाचा: Who is Mahieka Sharma: कोण आहे हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड महिका शर्मा? वय वर्ष 24 पण कमाई आहे बक्कळ

 

डिप्रेशनवरील संघर्षाबद्दल बाबिलचं पुढचं वक्तव्य

त्याने पुढे लिहिलं की, ‘मी मदतीसाठी ओरडत होतो. मी माझ्या भावना दाबू शकलो नाही. त्याचं ओझं माझ्या आरोग्यावर पडलं. माझा आत्मा कंटाळला होता. तुम्ही तुमच्या  गर्लफ्रेंडसोबत भांडत होतो, पण मी डिप्रेशनचा सामना करत होतो.... थांब…’ बाबिलचा ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फॅन्सपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्याच्या या भावनिक पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता विजय वर्माने कमेंट करत लिहिलं की ‘बाबिल, आम्ही तुझ्यासोबत आहोत.’ तर गुलशन देवैया आणि अपारशक्ति खुराना यांनी देखील त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

हे ही वाचा: ‘ते माझी पँट काढू...' महेश भट्टांचा धक्कादायक खुलासा; या घटनेनंतर आईसोबतच्या नात्यात आला होता कडवटपणा

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

 

 

हे ही वाचा: 'I love you...', LIVE सामन्यात शुभमन गिलला मिळालं प्रपोजल; मिस्ट्री गर्ल झाली व्हायरल

 

फॅन्सची चिंता वाढली

चाहत्यांनीही बाबिलच्या मानसिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिलं, ‘बाबिल, तू ठीक आहेस ना? स्टारडम खूप कठोर असतं. जगासमोर काय शेअर करायचं याची काळजी घे. स्वतःला सावरण्यासाठी वेळ दे. तुझ्याकडे एक प्रेमळ कुटुंब आहे.’ तर दुसऱ्या यूजरने म्हटलं, ‘या मुलासोबत नेमकं काय घडतंय माहित नाही, पण इतक्या प्रतिभावान कलाकाराला असं तडफडताना पाहणं वेदनादायक आहे. काही सरासरी नेपो किड्स पीआर आणि कनेक्शन्सच्या जोरावर यश मिळवत आहेत, आणि बाबिलसारख्या खऱ्या टॅलेंटेड कलाकारांना संधीपासून वंचित ठेवत आहेत. हेच आहे बॉलिवूडचं कटू वास्तव.’

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More