मुंबई : अभिनेत्री दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम टीव्ही इंडस्ट्रीचं लाडकं आहे. २२ फेब्रुवारी २०१८ साली या कपलने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडीने २१ जून २०२३ साली त्याच्या पहिल्या छोट्या राजकुमार रुहानचं स्वागत केलं. आता दीपिका आणि शोएब कायम त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत आहेत. सध्या शोएब 'झलक दिखला दा 11' हा शो करत आहे. तर पत्नी या नात्याने दीपिका कायमच सेटवर त्यांच्या मुलासोबत पतीला भेटायला येते. यावेळीही दीपिका कक्कड सेटवर पोहचली होती. यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसच्या चर्चांनी जोर धरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Shoaib Ibrahim आणि त्याचा मुलगा रुहानसोबत दीपिकाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. शोएबच्या परिवाराला 'झलक दिखला जा 11'च्या सेटच्या बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पोज देताना पाहिलं जाऊ शकतं. व्हिडीओमध्ये शोएब निळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये त्याने काळ्या रंगाच्या पँन्टसोबत पेअर केलं आहे. 


शोएब इब्राहिमला त्यांचा मुलगा रुहानला कडेवर घेतलेलं पाहिलं जाऊ शकतं. जो प्रिंटेड ओनेसी खूप सुंदर दिसत आहे. खरंतर दीपिका लाल रंगाच्या अनारकलीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. यासोबत हलका मेकअप आणि केस मोकळे ठेवत तिचा लूक पुर्ण केला आहे. अभिनेत्रीच्या या सुंदर लूकने चार चांद लावले होते. मात्र अभिनेत्रीने तिच्या ओढणीला पिन लावला होता. जेणेरुन तिची ओढणी पोटापर्यंत येईल आणि सरकणार नाही. तिने ही ओढणी यासाठी घेतली होती जेणेकरुन तिचं पोट दिसणार नाही. यानंतर नेटिजन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि चाहत्यांना विचारात पाढलं की अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नंच आहे.
 
जसा हा व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आला तसं नेटिझन्सने या व्हिडीओवर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला सुरुवात केली आहे. फँन्स एक्साइटेड होते. कारण त्यांनी असा अंदाज लावला होता आणि त्यांना यावर विश्वासही बसू लागला होता की, दीपिका तिच्या ओढणीने तिचा बेबीबंप लपवत आहे. व्हिडीओवर रिएक्शन देत एका युजरने लिहीलं की, 'वाटतंय अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.' तर अजून एकाने लिहीलंय, ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्यासारखी वाटत आहे. तर अजून एकाने लिहीलंय, हे भगवान ती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडीओवर करत आहेत.