ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया सावत्र भावंड? काय आहे बॉलिवूडचं कटू सत्य? bads of Bollywood मध्ये उल्लेख

बॉलिवूडचे अनेक सिक्रेट आजही चाहत्यांपासून लपलेले आहेत. असंच एक कटू सत्य म्हणजे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया ही सावत्र भावंड? काय आहे यामागचं सत्य?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 17, 2025, 09:38 PM IST
ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया सावत्र भावंड? काय आहे बॉलिवूडचं कटू सत्य? bads of Bollywood मध्ये उल्लेख

ऋषी कपूर यांना नीतू सिंह यांच्याशी नाही तर डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न करायचं होतं. बॉबी सिनेमा दरम्यान डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र या प्रेमाला ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांचा कडाडून विरोध होता. 

Add Zee News as a Preferred Source

असं म्हटलं जातं की, डिंपल कपाडिया या नरगीस आणि राज कपूर यांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं बाळ होतं. हे सत्य या दोघांनीही बॉलिवूडपासून आणि सगळ्यांपासूनच लपवलं. ही माहिती Monkkeyguystalks वर देण्यात आली आहे. 

त्यावेळी राज कपूर यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना 5 मुलं देखील होती. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या डिंपल यांना कपाडिया कुटुंबाला दत्तक देण्यात आलं. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या प्रेमाला राज कपूर यांचा विरोध होता कारण ते एकमेकांचे सावत्र भावंडं आहेत. यामुळे राज कपूर यांनी कधीच डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांच्या नात्याला होकार दिला नाही. 

डिंपल कपाडिया - राजेश खन्ना 

70 च्या दशकात, प्रत्येक मुलगी राजेश खन्ना बद्दल वेडी होती. तो एक रोमँटिक अभिनेता होता ज्याची शैली सर्वांना आवडायची आणि त्याच्या प्रेमात पडलेल्या अनेक महिलांमध्ये डिंपल कपाडियाचा समावेश होता. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल कपाडियाने 31 वर्षांच्या राजेश खन्नाशी लग्न केले. त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ते वेगळे राहू लागले. तरीही, डिंपलने राजेश खन्ना यांना कधीही घटस्फोट दिला नाही.

नीतू सिंह - ऋषी कपूर 

१९७४ मध्ये आलेल्या 'झेहरीला इन्सान' या चित्रपटाच्या सेटवर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची पहिली भेट झाली. त्यावेळी नीतू फक्त १५ वर्षांच्या होत्या. ऋषी आधीच रिलेशनशिपमध्ये होते. ऋषी सेटवर अभिनेत्रीला चिडवत असत, कधीकधी नीतूलाही चिडवत असत.

ऋषी कपूरच्या ब्रेकअपनंतर, नीतू कपूरशी त्यांची जवळीक वाढली. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. त्यांनी 12 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रत्येक चित्रपटात त्यांची जोडी चांगलीच गाजली.

बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये उल्लेख 

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये याचा उल्लेख असल्याच सांगण्यात येत आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More