कोंकणा सेन 7 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात? रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा

Is Konkona Sen In Relatioship : कोंकणा सेन 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये? 7 वर्षांनी लहान आहे अभिनेता

दिक्षा पाटील | Updated: May 16, 2025, 01:58 PM IST
कोंकणा सेन 7 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात? रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा
(Photo Credit : Social Media)

Is Konkona Sen In Relatioship : गेल्या बऱ्याच काळापासून अभिनेता अमोल पराशर आणि कोंकणा सेन यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. अशात कोंकणा सेन ही अमोलच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये दिसली. कोंकणाला पाहताच अमोलच्या चेहऱ्यावर आनंद झाल्याचे दिसले. त्यानं तिला मिठी मारली आणि त्यानंतर कोंकणानं अमोरसोबत पापाराझींसाठी पोज देखील दिले. अमोल आणि कोंकणानं त्यांच्या नात्याबाबत काही उघडपणे सांगितलं नाही. तर ते दोघं पहिल्यांदाच पब्लिकली एकत्र दिसले. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की ते लवकरच आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर करू शकतात. सध्या अमोल पराशर त्याच्या ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सीरीजला मिळत असलेल्या यशाचा आनंद घेत आहे.

कोंकणा सेन ही घटस्फोटित आहेत आणि एका मुलाची आईसुद्धा आहेत. 2010 मध्ये तिनं अभिनेता रणवीर शौरीसोबत लग्न केलं होतं, पण 2020 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कोंकणा सिंगल मदर आहे. आता अमोलसोबतच्या ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. अमोल वयानं कोंकणापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

अमोल पराशरनं एकदा ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. त्यानं कबूल केलं होतं की तो एका सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्यानं पार्टनरचं नाव सांगितलं नव्हतं. अमोल म्हणाला की, 'माझं कोणी अडवत नाहीये. पण याबद्दल सांगावं असं मला कधी वाटलं नाही. खरं प्रेम हे पवित्र असतं आणि ते जेव्हा असं लपवून ठेवलं जातं, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक असतं. तर मला यातून काय मिळणार आहे? काही लोक याचा PR साठी उपयोग करतात.'

अमोलने पुढे असंही म्हटलं होतं की, 'इथे रिलेशनशिप नसले तरीही ते तयार करण्यात येतात. मला आधीही PR वाल्यांनी सुचवलं होतं की काही तरी स्टोरी चालवूया. पण मला वाटतं की लोकांनी माझ्या कामाबद्दल बोलावं. मला काही सगळ्यांना सांगायचं असेल, तर ते मी माझ्या कामातून करीन.'

हेही वाचा : चाळीतलं बालपण, अभिनयात स्ट्रगल; आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे 'हा' अभिनेता बायकोही टॉपची अभिनेत्री

अमोलनं यावेळी कोंकणाचं नाव घेतलं नव्हतं, पण त्यानं एवढं नक्की सांगितलं होतं की त्याच्या पार्टनरबद्दल फारसं काही लपवलेलं नाही. ते दोघं एकत्र पार्टींना जातात आणि लोकांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. अमोल आणि कोंकणानं 2019 मध्ये आलेल्या ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.