Anup Jalota : भजन सम्राट अशी ओळख असणारे लोकप्रिय गायक अनूप जलोटा हे नेहमीच चर्चेत राहतात. कधी त्यांचं खासगी आयुष्य तर कधी त्यांनी कोणत्या विषयावर मांडलेलं त्याचं मत. नेहमीच ते वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करताना आणि दिसतात. त्याशिवाय अनूप जलोटा हे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत अपडेट देताना दिसतात. दरम्यान, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं सगळीकडे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे अनूप जलोटा हे मुस्लिम झाल्याचे म्हटले जात आहे.
अनूप जलोटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. अनूप जलोटा यांनी रमजानचा महिना सुरु असतानाच आता एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी हिरव्या रंगाचा कुर्ता, टोपी आणि गळ्यात माळ परिधान केली आहे. त्यांचा हा लूक एका मुस्लिम व्यक्तीसारखा दिसत आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांनी धर्म बदलला की काय किंवा ते मुस्लिम झाले की काय? मात्र, असं काही नसून अनूप जलोटा यांनी हा लूक केल्याचं कारण देखील सांगितलं आहे. त्यांनी कॅप्शन देत लिहिलं की भारत देश है मेरा या चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी खूप उत्सुक आहे. सुंदर अशा वातावरणात नाशिकमध्ये आम्ही हे शूटिंग करतोय.
दरम्यान, कधी अनूप जलोटा हे त्यांच्यात आणि त्यांची जोडीदार जसलीन मथारू यांच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे चर्चेत आले होते. आता त्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं कारण हे त्या दोघांमध्ये असलेला वयाचा असा 37 वर्षांचा फरक होता.
हेही वाचा : धोनीचा 'अॅनिमल' लूक पाहून नेटकरी सैराट, संदीप वांगा रेड्डीसोबतची जाहिरात तुफान VIRAL
अनूप जलोटा यांनी ऑल इंडिया रेडियोमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्या लोकप्रिय भजनांविषयी बोलायचं झालं तर ऐसी लागी लगन, मैं नहीं माखन खायो, रंग दे चुनरिया, जग में सुंदर है दो नाम आणि चदरिया झीनी रे झीनी आहेत. त्याशिवाय त्यांनी सुत्रसंचालक म्हणून धर्म और हम, 2002 ते 2005 या काळात ही मालिका प्रदर्शित झाली होती.