'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Marathi Serial Chala Hawa Yeu Dya :  मराठी मालिका 'चला हवा येऊ द्या' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2025, 05:06 PM IST
'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
(Photo Credit : Social Media)

Marathi Serial Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत फक्त कथा असलेलेच असतात असं नाही. अनेक रिअ‍ॅलिटी शो आणि कॉमेडी शो आहेत. झी मराठीनं गेल्या अनेक वर्षांपासून अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली. त्यातच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात स्थान निर्माण केलं. तब्बल दहा वर्षं, म्हणजे 2014 ते 2024 या काळात हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र, 2024 मध्ये या कार्यक्रमात अर्थात तेच ते विनोद आणि त्यात काहीच वेगळेपणा नाही म्हणून हा शो बंद करण्याचा निर्णय वाहिनीनं घेतला. वाहिनीच्या या निर्णयानं अनेक प्रेक्षक नाराज झाले. पण आता हाच शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

खरंतर, गेल्या वर्षी अर्थात मार्च 2024 मध्ये ही मालिका बंद झाली. त्यानिमित्तानं या कार्यक्रमात दिसलेल्या कलाकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झी मराठीकडून अधिकृपणे करण्यात आली नाही, पण वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच ही मालिका अर्थात कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

हेही वाचा : 'मी अमिताभ यांना मिठी मारली अन्...', रेखा यांनी सांगितला 'सिलसिला'च्या सेटवरील किस्सा

नुकताच वाहिनीचा लूक बदलला आहे, गेल्या 26 वर्षांपूर्वी या वाहिनीचं एक रूप आपण पाहत होतो. मात्र, आता पासून वाहिनीचं एक नवं रूप पाहिलं आहे. ‘झी मराठी’च्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा यांनी सांगितलं की, 'सदैव तुमची, झी मराठी… हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवतं. एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरांतली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांबरोबरचं नातं आणखी दृढ करण्यासाठी ‘झी मराठी’ एका नवीन रूपात, नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहेया नव्या प्रवासात ‘देवमाणूस’ आणि लवकरच सुरु होणारी ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर, ‘चला हवा येऊ द्या’सारखा बहुप्रतीक्षित कार्यक्रमही नव्याने परतत असल्याने हास्यप्रेमी प्रेक्षकांसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरणार आहे.' पण आता या कार्यक्रमाचं शूटिंग कधी सुरु होणार किंवा हा कार्यक्रम कधी पाहायला मिळणार याविषयी काहीही माहिती दिली नाही.