1985 चा चित्रपट, हिरो-हिरोईनचा दुर्दैवी शेवट, शेवटी कुत्रा ठरतो सुपरहिरो, प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

जैकी श्रॉफने एकापेक्षा एक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये एका चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्रीचा मृत्यू होतो.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 16, 2025, 06:39 PM IST
1985 चा चित्रपट,  हिरो-हिरोईनचा दुर्दैवी शेवट, शेवटी कुत्रा ठरतो सुपरहिरो, प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी

Jackie Shroff : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं अतिशय संवेदनशीलपणे दाखवलं जातं. कधी ‘हाथी मेरा साथी’मधील हत्ती आणि राजेश खन्ना तर कधी देवानंदच्या ‘इंसानियत’मधील चिंपांझी अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अशाच धर्तीवर 80 च्या दशकात आलेल्या जैकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ या सुपरहिट चित्रपटानेही माणूस आणि कुत्रा यांच्यातील प्रेम, निष्ठा आणि विश्वासाचे नातं हळुवारपणे उभं केलं. आजही हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं.

Add Zee News as a Preferred Source

9 ऑगस्ट 1985 रोजी प्रदर्शित झालेला ‘तेरी मेहरबानियां’ हा विजय रेड्डी दिग्दर्शित चित्रपट कन्नड चित्रपट ‘थालिया भाग्य’ चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत जैकी श्रॉफ आणि पूनम ढिल्लों होते. तसेच अमरीश पुरी, असरानी, सादाशिव अमरापुरकर, राज किरण यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. परंतु या चित्रपटाची खरी स्टार होती ब्राउनी नावाची कुत्री, जिने मोती हा जबरदस्त लोकप्रिय झालेला रोल साकारला.

अभिनेता-अभिनेत्रीचा मृत्यू

या चित्रपटाची कथा एका ईमानदार युवक राम (जैकी श्रॉफ) भोवती फिरते. एक दिवस तो चुकून दुचाकीने एका कुत्र्याला धडक देतो आणि त्याला घरी नेऊन सांभाळतो. तेव्हाच त्याचं आणि मोतीचं घट्ट नातं तयार होतं. गावात जाताच रामची भेट होते गावावर राज्य करणाऱ्या भ्रष्ट ठाकुर विजय सिंह (अमरीश पुरी) याच्याशी. राम आणि बिजलीची प्रेमकहाणी सुरू असते, परंतु ठाकुरची नजरही बिजलीवर असते. राम गावकऱ्यांना एकत्र करून ठाकुरच्या अत्याचारांविरोधात उभा राहतो. शेवटी ठाकुरचे गुंड रामची हत्या करतात.

येथेच चित्रपटातला सर्वात भावनिक टप्पा सुरू होतो. रामच्या मृत्यूनंतर मोती बदला घेण्यासाठी उठतो. गुंडांना शोधून त्यांचा एक-एक करून खात्मा करतो आणि पुरावे गोळा करून पोलिसांपर्यंत पोहोचवतो. मोतीने दाखवलेली निष्ठा, प्रेम आणि साहस हा चित्रपटाचा आत्मा ठरतो.

बजेट, कमाई आणि लोकप्रियता

या चित्रपटाचे बजेट  1.20 कोटी रुपये होते तर या चित्रपटाने भारतात 2.48 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने 4 कोटींची कमाई केली.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

FAQ

1. ‘तेरी मेहरबानियां’ चित्रपट कधी रिलीज झाला?

हा चित्रपट 9 ऑगस्ट 1985 रोजी प्रदर्शित झाला.

2. चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते?

चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रेड्डी यांनी केले आहे.

3. हा चित्रपट ओरिजिनल आहे की रिमेक?

‘तेरी मेहरबानियां’ हा कन्नड चित्रपट ‘थालिया भाग्य’ (1984) चा हिंदी रिमेक आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More