'हाऊसफूल-४' आता नानाऐवजी हा अभिनेता

मी टू मोहिमेचा फटका बसलेल्या हाऊसफुल्ल चार चित्रपटात फेरबदल करण्यात आले आहेत.

Updated: Oct 17, 2018, 10:18 PM IST
'हाऊसफूल-४' आता नानाऐवजी हा अभिनेता

मुंबई : मी टू मोहिमेचा फटका बसलेल्या हाऊसफुल्ल चार चित्रपटात फेरबदल करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटातून बाजूला झाले. त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आता फरहाद समजी यांना देण्यात आली आहे.

तर नाना पाटेकर यांची भूमिका आता जॅकी श्रॉफ साकारणार आहे. याआधी संजय दत्त आणि अनिल कपूर यांचीही नावं या चित्रपटातल्या नानांच्या भूमिकेसाठी चर्चेत होती. मात्र आता जॅकी श्रॉफ लवकरच चित्रिकरणात सहभागी होणार आहे. नाना पाटेकर यांचा आधी चित्रिकरण झालेला भाग चित्रपटातून हटवणार की तो भाग कायम ठेऊन नवीन चित्रिकरण सुरु होणार याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.