मुंबई : 2022 हे नववर्ष सुरू झालं आहे.  सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वातील स्टार्सच्याही नव्या वर्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र, वर्षाच्या सुरुवातीलाच जॅकलिन फर्नांडिसला एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीची आई किम फर्नांडिसला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जॅकलिनची आई-वडील सध्या बहारीनमध्ये आहेत. तर अभिनेत्री या वाईट काळात मुंबईत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, जॅकलिन फर्नांडिसची आई सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. किम फर्नांडिसच्या आरोग्य अपडेटबद्दल अधिक तपशीलांची प्रतीक्षा करत आहे. जॅकलीनने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'श्रीलंकेतील माझे मित्र आणि बहरीनमध्ये राहणारे माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे की, मी बहारीनमध्ये त्यांच्यासोबत राहावं... श्रीलंकेतील माझे काका आणि चुलत भाऊही मला त्यांच्यासोबत रहायला सांगतात.'


मात्र, कामाची बांधिलकी लक्षात घेऊन जॅकलीनला मुंबईतच राहावं लागतं. यासोबतच अभिनेत्री 200 कोटींचा गंडा घालणाऱ्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. या प्रकरणामुळे अभिनेत्रीला अनेकवेळा ईडीसमोर हजर व्हावे लागलं आहे. त्याचबरोबर तिला 'द-बँग टूर'मधून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला.



जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, जॅकलिन फर्नांडिस सध्या अक्षय कुमार आणि नुसरत भरुचा स्टारर राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. याशिवाय अभिनेत्री रणवीर सिंगसोबत सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. तसंच ता बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय आणि क्रिती सेननसोबत दिसणार आहे. अॅटॅक या चित्रपटात जॅकलीन जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.