मुंबई : 'स्पायडरमॅन' या चित्रपटामधून जगभरात लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता जेम्स फ्रँको सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर सेक्शुअल हरासमेंटचे आरोप झाल्यानंतर तब्बल ४ वर्षांनंतर त्याने मौन तोडलं आहे. त्याने एक धक्कादायक खुलासा केला असून या बद्दल बोलताना आपण सेक्स अॅडिक्शनशी झुंज देत असल्याची कबुली त्याने दिली आहे. तो स्वतःच्या एक्टिंग स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबध ठेवायचा.  तो गेल्या काही वर्षांपासून त्याचं वर्तन सुधारण्याचं काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेम्स फ्रँकोने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, तो विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यासोबत शारिरीक संबध ठेवायचा.  जे फार चुकीचं होतं. अभिनेत्याने असंही सांगितलं की, त्याच्या सेक्स एडिक्शनमुळे त्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी एक्टिंग स्कूल सुरू केलं नाही. तो म्हणाला, 'तेव्हा माझा विचार होता की, सहमती झालं तर ठीक आहे. तेव्हा मी स्पष्ट नव्हतो.'


4 वर्षांपूर्वी जेम्स फ्रँकोवर सेक्शुअल हरासमेंटचे आरोप झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्याने या प्रकरणी मौन सोडलं असून डिटेल्समध्ये सगळं सांगितलं आहे.  एका वृत्तानुसार पाच महिलांनी फ्रँकोवर गैरवर्तनाचा आरोप केला होता.


यानंतर 2019 मध्ये दोन महिलांनी जेम्सविरोधात खटला दाखल केला. जेम्सवर अभिनेता बनण्याच्या इच्छेने एक्टिंग स्कूलमध्ये आलेल्यांचं शोषण केल्याचा आणि तरुणींना सेक्स सीन शूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप होता.


फ्रँकोने सांगितलं की, लहान वयातच त्याला दारूचं व्यसन होतं. त्यानंतर त्याला सेक्सचं व्यसनही जडलं. तो म्हणाला, 'हे खूप पॉवरफूल ड्रग आहे.' 2016 पासून तो सेक्सच्या व्यसनातून सावरत असल्याचंही त्याने सांगितलं. त्याच्यावर झालेल्या आरोपांनंतर तो यावर खूप काम करत आहेत आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणाला, 'मला लोकांना दुखवायचं नाही.'



अभिनेता असण्यासोबतच जेम्स एक चित्रपट निर्माता आणि लेखक देखील आहे. 'स्पायडरमॅन ट्रायलॉजी', 'मिल्क', 'राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स' यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये तो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो.