'पुरुषांना मासिकपाळी आली असती तर युद्ध झालं असतं'; मुलींच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवर जान्हवी संतप्त

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मासिकपाळीच्या वेळी मुलीच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवरून खडेबोल सुनावले आहेत.  

दिक्षा पाटील | Updated: Apr 19, 2025, 07:41 PM IST
'पुरुषांना मासिकपाळी आली असती तर युद्ध झालं असतं'; मुलींच्या मूडस्विंगची खिल्ली उडवणाऱ्यांवर जान्हवी संतप्त
(Photo Credit : Social Media)

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होतात. अनेकदा तिचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. नुकतीच तिनं एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत जान्हवीनं अशा पुरुषांवर टीका केली आहे, ज्यांनी महिलांना मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासाकडे गैरसमज किंवा द्वेषपूर्ण नजरेने पाहतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. या सगळ्याचा महिलांच्या मानसिकतेवर कसा परिणाम करु शकतो याविषयी सांगितलं आहे.      

हाउटरफ्लाय या प्लॅटफॉर्मवर बोलताना जान्हवीने सांगितलं की, 'जेव्हा एखादी स्त्री एखाद्या गोष्टीवर नाराज असते, आपली बाजू मांडते, तेव्हा अनेकदा पुरुष विचारतात, ‘तुला पाळी आलीये का?’  तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाही. आमचं शरीर ज्या शारीरिक आणि मानसिक अवस्थांमधून जातं, ते खूप गुंतागुंतीचं असतं. पण जर तुम्ही खरोखरच सहानुभूतीशील असाल, तर हे बोलण्याआधी एक मिनिट थांबा. बहुतेक प्रकरणांमध्ये, तुम्हाला एका मिनिटाची आवश्यकता असते कारण ज्या पद्धतीने आपले हार्मोन चार्टच्या बाहेर असतात, त्यामुळे आपण ज्या वेदनांमधून जातो ते खूप कठीण असतं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीनं मासिकपाळीला काही पुरुषांच्या नजरेत पाहता म्हटलं की हे सगळं विचित्र आहे. कारण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर पुरुषांना मासिक पाळी आली असती, तर ते या वेदना आणि मूड स्विंग एक मिनिटही सहन करू शकले नसते. जर पुरुषांना मासिक पाळी असती तर कदाचित तिसरं महायुद्ध झालं असतं. जान्हीवनं केलेल्या या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. स्त्रियांच्या शरीराशी आणि भावनांशी निगडित विषयांवर ज्या सहजतेने टीका केली जाते, ती थांबवण्याची गरज जान्हवीने या मुलाखतीत स्पष्टपणे मांडली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित चर्चा अधिक खुल्या आणि संवेदनशील होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा : मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर...; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, 'मी देवाला मानत नाही'

जान्हवीचे गेल्या वर्षी अर्थात 2024 मध्ये तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी एक 'मिस्टर एंड मिसेज माही', 'उलझन' आणि 'देवरा पार्ट 1'. आता ती सध्या तिचा आगामी चित्रपट 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय तिचा 'परम सुंदरी' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर जान्हवी 'पेड्डी' या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत दिसणार आहे. राम चरण, शिव राजकुमार, दिव्येंदु शर्मा आणि जगपती बाबू या कलाकारांसोबत ती दिसणार आहे. 'पेड्डी' 27 मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.