लंडनमध्ये बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूरचा रोमँटिक ब्रेक; एकाच प्लेटमधून खाण्याचा व्हिडीओ व्हायरल, नेमका आहे तरी कोण?

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिची बहीण खुशी कपूर आणि बॉयफ्रेंडसोबत सहलीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. या ट्रिपमधील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना तिच्या आठवणींमध्ये सामील केलं आहे.

Intern | Updated: Jun 20, 2025, 05:28 PM IST
लंडनमध्ये बॉयफ्रेंडसोबत जान्हवी कपूरचा रोमँटिक ब्रेक; एकाच प्लेटमधून खाण्याचा व्हिडीओ व्हायरल, नेमका आहे तरी कोण?

Janhavi Kapoor And Shikhar Pahariya Cute Moment: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बऱ्याच चर्चेत आहे. तिचा कान्स फेस्टिव्हलमदील लूक चाहत्यांना फारच आवडला. तिच्या आगमी चित्रपटांची देखील चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातचं सध्या जान्हवी लंडनमध्ये तिचा बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे. तिच्या या युरोपियन ट्रिपमध्ये तिची बहीण आणि अभिनेत्री खुशी कपूर देखील सहभागी झाली आहे. सोशल मीडियावर जान्हवीने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बॉयफ्रेंडसोबत गोड क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. एक व्हिडीओ विशेष लक्ष वेधून घेतो, ज्यामध्ये जान्हवी त्याच्या प्लेटमधून खाताना दिसते आणि त्यावर त्याची रिअॅक्शन चाहत्यांना फारच मजेशीर वाटली आहे. दोघांचा हा क्षण इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहूयात कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड. 

'कॉफी विथ करण'मध्ये खुलासा
जान्हवी आणि शिखरच्या नात्याची अधिकृत चर्चा सर्वप्रथम करण जोहरच्या प्रसिद्ध शो 'कॉफी विथ करण' च्या 8व्या सीझनमध्ये झाली होती. करणने जान्हवीला त्यांच्या सततच्या भेटी आणि ब्रेकअपबद्दल विचारले असता, जान्हवीने उत्तर दिलं, 'तू ते गाणं ऐकलंय का 'नादान परिंदे घर आजा'? शिखर मला ते गाणं नेहमी म्हणायचा.' या आधीही जान्हवीला शिखरच्या नावाचा नेकलेस घालून पाहिलं गेलं आहे. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंट्स आणि ट्रिप्समध्ये एकत्र दिसले आहेत, ज्यामुळे त्यांचं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शिखर पहारिया कोण आहे?
शिखर पहारिया हा भारताचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे एक अभिनेत्री होत्या. शिखरचा भाऊ वीर पहारियाने नुकताच बॉलिवूडमध्ये 'स्काय फोर्स' या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, शिखर जान्हवीसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील उपस्थित होता. तिथे जान्हवीने तिच्या आगामी 'होमबाउंड' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सहभाग घेतला. हा चित्रपट नीरज घायवान दिग्दर्शित असून, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिका साकारत आहेत.

हे ही वाचा: करिश्मा- अभिषेकचं नातं संपण्यामागचं खरं कारण समोर; अमिताभ बच्चन म्हणाले, 'वेगळं होणं कधी कधी योग्यच असतं'

जान्हवी कपूरच्या आधीच्या अफेअर्सची चर्चा

शिखरच्या आधी जान्हवीचं नाव तिच्या जवळच्या मित्रांसोबत जोडलं गेलं होतं. सर्वप्रथम तिचं नाव अक्षत राजनसोबत चर्चेत आलं होतं. त्यानंतर ईशान खट्टरसोबत तिचं नाव जोडण्यात आलं, जेव्हा दोघांनी 'धडक' चित्रपटात काम केलं. काही काळानंतर कार्तिक आर्यनसोबत देखील जान्हवीचं नाव जोडलं गेलं. मात्र सध्या ती तिच्या शाळेतील मित्र शिखर पहारियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'परम सुंदरी', वरुण धवनसोबत 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आणि राम चरणसोबत 'पेड्डी' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.