Javed Akhtar Pakistani Singer : बॉलिवूडचे ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपासून त्यांचं चर्चेत येण्याचं कारण एकतर मोहम्मद शमीनं रोजा न ठेवण्यावर दिलेली प्रतिक्रिया ते रोहित शर्माला बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यावरून ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी पाकिस्तानी गायक मुअज्जम अली खान यांच्या आवाजाची स्तुती केली आहे आणि त्यांना गाणं गाण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आता त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात येण्यास सांगितले नाही तर थेट भेटण्यासाठी बोलावलं आहे.
जावेद अख्तरनं सोशल मीडियावर मुअज्जम अली खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे अनेक लोक आकर्षित झाले आहेत. काही लोकांनी त्यांचा आवाज हा दिवंगत गझल गायक जगजीत सिंग यांच्यासारखा असल्याचं म्हटलं. जावेद अख्तर यांनी शुक्रवारी 14 मार्च रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. मुअज्जम अली खान यांनी गायलेलं 'ये नयन डरे डरे' हे गाणं सगळ्यांनाच आवडतं.
Just now I watched a gentleman Muazzam saheb on youtube singing “ yeh nain deray deray “ could he please contact me . I will be thankful if he sings a few songs for us .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 14, 2025
जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की "नुकताच मी यूट्यूबवर मुअज्जम साहब यांना 'ये नयन डरे डरे' हे गाणं गाताना ऐकलं. तर ते आमच्यासाठी काही गाणी गातील तर मी त्यांचा आभारी असेन." जावेद अख्तर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी म्हणाला, 'त्यांचा आवाज खरंच खूप सुंदर आणि अगदीच जगजीत सिंग यांच्यासारखा आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सोशल मीडियाची एक चांगली बाजू पाहायला मिळाली.'
मुअज्जम अली खान नेहमीच सोशल मीडियावर गाणी शेअर करताना दिसतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे 1.5 लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
पाकिस्तानी गायक मुअज्जम साहब यांच्या सोशल मीडिया प्रोफाइनलनुसार, ते एक अभिनेता आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांचे गाणे 'ये नयन डरे डरे' गाण्यांना यूट्यूबवर 65 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि दोन हजार लाइक्स मिळाले आहेत. तर त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 37 हजार सबस्क्रायबर्स आहेत.