बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजसेविका जया बच्चन यांनी नुकतंच एका मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जया बच्चन या नेहमीच आशयघन आणि सामाजिक विषयांना हाताळणाऱ्या कलाकृतींना प्रोत्साहन देत असतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी अलीकडेच पाहिलेल्या ‘स्थळ’ या मराठी चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या असून, त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये जया बच्चन अत्यंत भावनिक होत या चित्रपटाबद्दल बोलताना दिसतात. त्या म्हणतात, ‘स्थळ’चे प्रस्तुतकर्ते सचिन यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी मला हा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आणि हा सिनेमा पाहून मी अत्यंत प्रभावित झाले.' जया बच्चन पुढे म्हणतात, 'काही कलात्मक गोष्टींबद्दल आपण चर्चाच करत नाही. अशा कलाकृती केवळ पाहिल्या जातात, अनुभवल्या जातात. ‘स्थळ’ हा त्याच प्रकारचा चित्रपट आहे जो मनाला भिडतो, विचार करायला भाग पाडतो आणि समाजातील वास्तव समोर आणतो.'
त्यांनी पुढे सांगितलं, ‘स्थळ’सारखे चित्रपट समाजासाठी खूप गरजेचे आहेत. हा एक खरा, संवेदनशील आणि वास्तवाला आरसा दाखवणारा चित्रपट आहे. मला तो मनापासून आवडला.' ‘स्थळ’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं आहे. समाजातील जात, वर्ग आणि पारंपरिक प्रथांमुळे होणाऱ्या भेदभावावर हा सिनेमा भाष्य करतो. संवेदनशील कथानक, वास्तववादी दिग्दर्शन आणि प्रभावी अभिनय यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर आहेत. त्यांच्या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करतोय. समाजातील असमानतेकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलवण्याची ताकद या चित्रपटात असल्याचं समीक्षकांचं मत आहे. OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांत ‘स्थळ’ या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे शिखर गाठले आहे. सध्या हा सिनेमा ट्रेंडिंग नंबर 1 वर असून, मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. जया बच्चनसारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केल्यामुळे ‘स्थळ’च्या टीमचं मनोबल उंचावलं असून, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
FAQ
जया बच्चन यांनी ‘स्थळ’ या चित्रपटाचं कौतुक का केलं?
जया बच्चन यांनी ‘स्थळ’च्या वास्तववादी कथानकाचं, सामाजिक संदेश देणाऱ्या मांडणीचं आणि कलात्मक दिग्दर्शनाचं मनापासून कौतुक केलं. त्यांना हा सिनेमा अत्यंत प्रामाणिक आणि समाजासाठी आवश्यक वाटला.
‘स्थळ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कोणी केलं आहे?
‘स्थळ’ या मराठी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जयंत दिगंबर सोमलकर यांनी केलं आहे.
‘स्थळ’ चित्रपट कुठे पाहता येईल?
हा सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, सध्या तो ट्रेंडिंग नंबर 1 वर आहे.
LIVE|
WI
130/3(39 ov)
|
VS |
NZ
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.