के-पॉप स्टारचा 'चिकनी चमेली' गाण्यावर डान्स; कतरिना कैफ सारखा Dance पाहून नेटकरी आवाक

K-Pop Star Dance on Chikni Chameli : के पॉप स्टारनं कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली' गाण्यावर केला डान्स

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2025, 05:56 PM IST
के-पॉप स्टारचा 'चिकनी चमेली' गाण्यावर डान्स; कतरिना कैफ सारखा Dance पाहून नेटकरी आवाक
(Photo Credit : Social Media)

K-Pop Star Dance on Chikni Chameli :  के-पॉप स्टार जॅक्सन वांग नुकताच त्याचा नवा एल्बम 'मॅजिक मॅन 2' च्या प्रचारासाठी भारतात आला होता. त्यानं त्याच्या देशाची संस्कृती आणि पॉप कल्चरला समजून घेण्याचा प्रयत्न केला. GOT7 स्टारचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो कतरिना कैफचं आयटम सॉन्ग 'चिकनी चमेली' वर डान्स करताना दिसतोय. या सगळ्यानं त्याच्या भारतीय चाहत्याचं मन जिंकलं आहे. 

ऑनलाइन समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये जॅक्सन हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या बॉलिवूड चित्रपटाच्या 'चिकनी चमेली' गाण्यावर डान्स करताना दिसतो. जॅक्सननं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून तो या गाण्याची हूक स्टेप करताना दिसतोय. त्यामुळे चाहत्यांना खूप आश्चर्य झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @my_love_from_china

तुमच्या आवडत्या कलाकाराला इतक्या सहजपणे ही स्टेप करताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. एका चाहत्यानं लिहिलं की, 'मी माझ्या आयुष्यात कधी विचार केला नाही की जॅक्सन हा या गाण्यावर डान्स करेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आम्ही जॅक्सनला जीटीए 6 आधी चिकनी चमेलीवर नाचताना पाहिलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माझी विनंती आहे की याला आधार कार्ड द्या.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ओहोहो, कतरिना जॅक्सन.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तर जॅक्सन, आता आधारकार्ड मिळालंच पाहिजे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला आनंद आहे की जॅक्सन या सगळ्याचा आनंद घेतोय.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तो किती सुंदर डान्स करतोय.'

जॅक्सननं त्याचा आगामी एल्बम 'मॅजिक मॅन 2' ला प्रमोट करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. जे त्याच्या 2022 च्या एल्बम मॅजिक मॅनचा दुसरा भाग आहे. त्याआधी 2023 मध्ये लोलापालूजा इंडियामध्ये परफॉर्म करण्यासाठी मुंबईत आला होता. जॅक्सननं नुकतीच हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे की तो हृतिक रोशन दिग्दर्शित 'क्रिश 4' मध्ये काम करणार आहे. 

हेही वाचा : PHOTOS : 'या' खास व्यक्तीसोबत प्राजक्ता माळीनं घेतलं केदारनाथचं दर्शन

दरम्यान, जॅक्सननं या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. हृतिक रोशनशिवाय जॅक्सननं करण जोहर, हनुमानगढ, सोनू निगम, सलीम मर्चेंट आणि अदनान सामी सारख्या भारतीय कलाकारांची भेट घेतली.