व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली

बॉलिवूड अभिनेत्री काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचा चार्म अजूनही कायम आहे. 

Updated: Jun 22, 2018, 12:11 PM IST
व्हिडिओ :... आणि काजोल पाय घसरून धपकन पडली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिचा चार्म अजूनही कायम आहे. काजोल सोशल मीडिया चांगलीच अॅक्टीव्ह असते. नवनवे फोटोज ती सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असते. अलिकडे या अभिनेत्रीसोबत असे काही घडले की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

असे काय झाले ?

व्हिडिओत तुम्ही पाहाल की, एका इव्हेंटसाठी काजोल निघाली होती. तेव्हा जात असताना असे काही झाले की, आजूबाजूचे लोक पाहतच राहीले. हा व्हिडिओ मॉलमधील आहे. यात काजोल आरामात चालत आहे. अचानक तिचा पाय घसरला  आणि ती पडली. 

व्हिडिओत तुम्ही पाहाल की, तोल गेल्यानंतर काजोल स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला ते शक्य होत नाही. व्हिडिओ पाहुन असे वाटते की, पडल्यानंतर तिला चांगलेच लागले असेल. पण याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. 

 

Kajol slips & falls in a shopping mall #instabolly #bebobolly #bollywood

A post shared by Bollywood Entertainment (@lnstabolly) on

या हॉलिवूड सिनेमात काजोलने दिला आवाज

काजोलने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या Elastigirl in Incredibles 2 मध्ये आवाज दिला होता. याबद्दल बोलताना काजोल म्हणाली की, मला हॉलिवूड सिनेमांची आवड आहे. कथा आवडल्यास मला ते काम करायला आवडते. फक्त असेच काही काम करायचे, असे मी ठरवत नाही. सध्या सुपरहिरोज लोकप्रिय आहेत. २०१५ मध्ये आलेल्या दिलवाले सिनेमात काजोल अखेरची झळकली होती. या सिनेमातही तिने ५ वर्षांनंतर कमबॅक केले होते.