Kangana Ranaut Emergency Movie : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'एमरजेन्सी' हा चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सतत काही ना काही कारणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. आता अखेर या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे. खरंतर हा चित्रपट 17 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक भेट म्हणून तो आजच म्हणजे 16 मार्च रोजी प्रदर्शित केला आहे.
कंगना रणौतच्या या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बॅन होता त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप नुकसान सहन करावं लागलं असतं. पण आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळत आहे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कंगना रणौतच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिस जर्नी तशीही सोपी नसती. त्याचं कारण की प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर प्रदर्शनाच्या आधीच कंगना आणि चित्रपटाच्या टीम ते चित्रपटाला ट्रोल करण्यात येत होतं. कंगना रणौतनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की या चित्रपटासाठी तिनं तिची खासगी प्रॉपर्टी विकली. आता हा चित्रपट प्रदर्शित होत नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे थोडं कठीण होऊ शकतं. आता जॅपकीनं एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की कंगनानं मुंबईच्या पाली हिल्समध्ये असलेला बंगला विकला आहे.
कंगनानं हा बंगला 32 कोटींना विकला. कंगना रणौतनं हा बंगला 2017 मध्ये खरेदी केला होता आणि तेव्हा तिला 20 कोटी 70 लाख रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यानंतर कंगनानं त्या बंगल्यावर 27 कोटी रुपयांचं लोन घेतलं होतं. त्याशिवाय कंगनानं या बंगल्यात खूप महागडं असं इंटेरियर केलं होतं. त्याचे फोटो तिनं स्वत: सोशल मीडियावर शेअर केले होते. कंगना रणौत या बंगल्याच्या प्रोडक्शन हाउसचं ऑफिस म्हणून वापर करत होती. बॉक्स ऑफिस प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण सतत होणारे वाद होत असल्याचं पाहता त्यांनी हा निर्णय घेतला.
हेही वाचा : 'जेव्हा मी थकून घरी जाते तेव्हा अम्मी मला...'; दीपिकाला घरकाम करायला सांगतात सासूबाई?
दरम्यान, हा चित्रपट अखेर 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, पण त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला नाहीच. कमाईच्या आकड्याविषयी बोलायचं झालं तर चित्रपटात भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं फक्त 23 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली आणि परदेशात या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर कमाईत या चित्रपटानं फक्त 2 कोटी 10 लाख रुपये होती. एका रिपोर्ट्नुसार आता निर्मात्यांना आशा आहे की नेटफ्लिक्सवर तरी चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.