विकेंडनंतर 'कांतारा' चित्रपटाच्या कमाईला लागला स्पीड ब्रेकर, सोमवारच्या दिवशी कमाईत 50% घसरण

कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत चक्क 50% घट झाल्याचं समोर आलं आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 7, 2025, 07:25 PM IST
विकेंडनंतर 'कांतारा' चित्रपटाच्या कमाईला लागला स्पीड ब्रेकर, सोमवारच्या दिवशी कमाईत 50% घसरण

Kantara Box Office Collection Day 5: गुरुवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाले. साउथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ आणि वरुण धवन - जान्हवी कपूर यांचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’. वीकेंडपर्यंत दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला पण सोमवारच्या दिवशी दोन्ही चित्रपटांच्या कमाईत मोठी घट दिसून आली.

Add Zee News as a Preferred Source

‘कांतारा: चॅप्टर 1’ जबरदस्त कामगिरी

पहिल्या दिवशी (गुरुवार) – ₹61.85 कोटी

दुसरा दिवस (शुक्रवार) – ₹45.50 कोटी

तिसरा दिवस (शनिवार) – ₹55 कोटी

चौथा दिवस (रविवार) – ₹63 कोटी

पाचवा दिवस (सोमवार) – ₹31.25 कोटी

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपटाने सोमवारच्या दिवशी कमाईमध्ये 50% घट पाहिली. तरीही पाच दिवसांची एकूण कमाई 265.50 कोटी पर्यंत पोहोचली आहे.

काही भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे 125 कोटी बजेट होते. साऊथच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची जबरदस्त उपस्थिती कायम राखली आणि निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी हा चित्रपट फायदेशीर ठरला.

सनी संस्कारी की तुलसी कुमारी 

वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’साठीही सोमवारचा दिवस कठीण ठरला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.25 कोटींची कमाई केली. तर शुक्रवार, शनिवार या चित्रपटाने सुमारे 7 कोटी दररोज आणि सोमवारी 3 कोटींची कमाई केली. 

चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आतापर्यंत 33 कोटी इतके आहे. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी असल्याने चित्रपटाने अजूनपर्यंत स्वतःच्या बजेट इतकी देखील कमाई केली नाही. 

 कोणत्या चित्रपटाची जास्त कमाई? 

‘कांतारा: चॅप्टर 1’ या चित्रपटाचे बजेट 125 कोटी होते. या चित्रपटाने पाच दिवसात 265.50 कोटींची कमाई केली. तर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाचे बजेट 60 कोटी होते. मात्र, चित्रपटाने अजूनपर्यंत पूर्ण कमाई केली नाही. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण कमाई 33 कोटींची कमाई केली आहे. यावरून स्पष्ट होते की कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ वरुण-जान्हवीच्या  चित्रपटापेक्षा जास्त यशस्वी ठरला आहे.

अशातच दोन्ही चित्रपटांसाठी सोमवारचा दिवस ‘स्पीड ब्रेकर’ ठरला. जरी वरुण धवनच्या चित्रपटाने तिकीटावर ऑफर देऊन कमाई टिकवण्याचा प्रयत्न केला असला तरीही प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठा फरक दिसला.

FAQ

दोन्ही चित्रपट कधी प्रदर्शित झाले?

साउथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर १’ आणि वरुण धवन-जान्हवी कपूरचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हे दोन्ही चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी एकाचवेळी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाले.

‘कांतारा: चॅप्टर १’ ची दिवसनिहाय कमाई किती?

पहिला दिवस (गुरुवार): ₹६१.८५ कोटी; दुसरा दिवस (शुक्रवार): ₹४५.५० कोटी; तिसरा दिवस (शनिवार): ₹५५ कोटी; चौथा दिवस (रविवार): ₹६३ कोटी; पाचवा दिवस (सोमवार): ₹३१.२५ कोटी.

‘कांतारा: चॅप्टर १’ ची एकूण कमाई किती?

पाच दिवसांत चित्रपटाने ₹२६५.५० कोटींची कमाई केली. बजेट ₹१२५ कोटी असल्याने तो फायदेशीर ठरला आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More