Kantara Chapter 1 चं वर्चस्व बॉक्स ऑफिसवर अजूनही कायम, 'अवतार'लाही टाकले मागे! Box Office Collection जाणून व्हाल थक्क

'Kantara: Chapter 1' box office collection day 8: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे. जागतिक चित्रपटसृष्टीही या चित्रपटापुढे शरण गेलीआहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 11, 2025, 12:51 PM IST
Kantara Chapter 1 चं वर्चस्व बॉक्स ऑफिसवर अजूनही कायम, 'अवतार'लाही टाकले मागे! Box Office Collection जाणून व्हाल थक्क
Kantara Chapter 1 Box Office Collection: Rishab Shetty Film Beats Avatar and leonardo dicaprio movie

Kantara Chapter 1 Box Office Collection: ‘कांतारा चॅप्टर 1’ चं वर्चस्व बॉक्स ऑफिसवर अजूनही कायम आहे! ऋषभ शेट्टीच्या या सिनेमाने असा धडाकेबाज परफॉर्मन्स दाखवला आहे की ‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’सारख्या जागतिक हिट चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि प्रत्येक दिवसागणिक वाढणारे कलेक्शन पाहून संपूर्ण सिनेमा इंडस्ट्री थक्क झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

बॉक्स ऑफिसवर घेतली झेप

ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरत आहे. ‘कांतारा’च्या पहिल्या भागानेही जबरदस्त कमाई केली होती, पण दुसऱ्या भागाने तर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाच्या रिलीजपासूनच तो देश-विदेशात धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात तर या सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम केला आहे.

हे ही वाचा: Hardik Pandya Birthday: हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात! करवाचौथच्या दिवशी दिली प्रेमाची कबुली! जाणून घ्या कोण आहे ती मिस्ट्री गर्ल

10 दिवसांत जबरदस्त कमाई

या चित्रपटाने फक्त 10 दिवसांतच विक्रमी आकडे गाठले आहेत. ‘कांतारा चॅप्टर 1’ दररोज 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत आहे. शुक्रवारच्या दिवशीच या चित्रपटाने तब्बल 22 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. फक्त भारतातच या चित्रपटाने 9 दिवसांत 359.40 कोटी रुपयांची नेट कमाई, तर ग्रॉस कलेक्शन 403.25 कोटी रुपये इतकं गाठलं आहे.

हे ही वाचा: Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने फ्लॉन्ट केली इंगेजमेंट रिंग, विजय देवरकोंडासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब?

 

ओव्हरसीज मार्केटमध्ये कमाई थोडी मंद असली तरीही चित्रपटाने परदेशात 72 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 497 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. होमब्ले फिल्म्सच्या अहवालानुसार ‘कांतारा चॅप्टर 1’ ने जगभरात 509 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

जगभरात ‘कांतारा’चं वर्चस्व

या चित्रपटाने जागतिक स्तरावरही अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. लिओनार्डो डिकॅप्रियोचा One Battle After Another आणि टेलर स्विफ्टचा The Official Release Party of a Showgirl या चित्रपटांच्या कलेक्शनलाही ‘कांतारा’ने मागे टाकलं आहे. लिओनार्डोच्या चित्रपटाने फक्त 40 मिलियन डॉलर कमावले असताना, ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ ने 53 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

हे ही वाचा: 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? अखेरीस सैफनं चाकू हल्ल्याबद्दल सोडलं मौन, ट्रोलर्सनाह दिलं चोख उत्तर!

 

आता सगळ्यांच्या नजरा या गोष्टीवर खिळल्या आहेत की, हा सिनेमा 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करतो का नाही. पण ज्या वेगाने चित्रपटाची कमाई सुरू आहे, त्यावरून इतकं नक्की म्हणता येईल की ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा साऊथ सिनेमाला जागतिक पातळीवर नवा दर्जा दिला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More