)
Kantara Chapter 1 Brahmakalasha song : ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित 'कांतारा' चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांच्या मनावर प्रचंड प्रभाव पाडला. ज्यानंतर कर्नाटकातील अंगर्तत खेड्यांमधील प्रथा, त्याबाबतची माहिती याविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळालं आणि याच्याच बळावर या दिग्दर्शकानं कथानकाचा पूर्व पूर्वार्ध प्रेक्षकांच्या भेटीला आणला. पंजुर्ली, गुलिगा म्हणजे नेमकं काय यावर त्यानं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच ऋषभ शेट्टी दिग्दर्शित Kantara: Chapter 1 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
काहींना चित्रपटाचं कथानक भावलं, तर काहींना त्यातील साहसदृश्य, काहींना कलाकारांचा अभिनय आवडला तर, काहीजणांचं मन ऋषभ शेट्टीनं साकारलेल्या 'कोला'वरच स्थिरावलं. समीक्षकांकडून मात्र या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तरीही बॉक्स ऑफिसवर मात्र 'कांतारा'चाच डंका वाजल्याचं दिसून आलं. अशा या चित्रपटातीव एक गाणं सध्या एका अनपेक्षित कारणामुळं चर्चेत आलं आहे.
किंबहुना हा चित्रपट, त्यातील गाणं वारंवार Zoom करून करून चाहते आणि नेटकरी पाहत आहेत. यामागं काय कारण आहे माहितीये? हे कारण म्हणजे गाण्यात दिसणारी पाण्याची एक मोठी बाटली, तीसुद्धा प्लास्टिकची. साधारण चौथ्या शतकातील काळ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे, त्यादरम्यान प्लास्टिकचं संशोधन झालं होतं का? असा खोचक प्रश्नसुद्धा चाहते विचारत आहेत.
आपल्या तीक्ष्ण नजरेनं चाहत्यांनी अतिशय भव्य स्तरावर चित्रीत करण्यात आलेल्या 'ब्रह्मकलश' या गाण्याचा व्हिडीओ पाहत त्यात दिसणारी पाण्याची बाटली अधोरेखित केली आणि इतक्या भव्य स्तरावर साकारण्यात आलेल्या चित्रपटादरम्यान ही अशी नगण्य चूक झालीच कशी हाच प्रश्न काहींनी उपस्थित केला. दरम्यान, ऋषभ शेट्टी किंवा चित्रपटाशी संलग्न कोणीही अद्याप या मुद्द्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही, असं असतानाही हे गाणं आणि मुख्यत्वे बाटली दिसणारा भाग चाहते व्हिडीओ थांबवीवून पाहत आहेत, त्यावर मिश्किल प्रतिक्रियाही देत आहेत.
I just learned that the Kadambas were the first to use plastic water cans #KantaraChapter1 pic.twitter.com/o8Hcam48AU
— Nand@n (@nandanx333) October 11, 2025
अशी एखादी चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. Game of Thrones या गाजलेल्या सीरिजमध्येही असाच एक प्रसंग घडल्याचं पाहायला मिळालं. जिथं खाण्याच्या फिस्टच्या चित्रीकरणादरम्यान अनावधानानं टेबलावर स्टारबक्स कॉफीचा कप तसाच कराहिला होता. तेव्हाही चाहत्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून कैक विनोदी कमेंट करत या प्रसंगावर भाष्य केलं होतं. आता तिच वेळ कांतारावर आली असून, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळं हे गाणंसुद्धा वारमंवा ऐकलं जात आहे
'ब्रह्मकलश' गाण्यात प्लास्टिकची बाटली का दिसली?
ब्रह्मकलश गाण्यातील सामुदायिक भोजन दृश्यात एक २० लिटरची प्लास्टिकची पाण्याची बाटली दिसली, जी चित्रीकरणादरम्यान अनावधानाने तिथे राहिली असावी. ही बाटली गाण्याच्या मध्यभागी स्पष्टपणे दिसते.
हा चित्रपट कोणत्या काळातील आहे?
कांतारा: चॅप्टर १ हा चित्रपट चौथ्या शतकातील कदंब राजवटीच्या काळात सेट केलेला आहे, जेव्हा प्लास्टिकचं संशोधन झालं नव्हतं. ही प्लास्टिक बाटली असा अनैतिहासिक त्रुटी (अनाक्रोनिझम) निर्माण करते, ज्यामुळे चाहते खोचक प्रश्न उपस्थित करत आहेत.
चाहत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
चाहत्यांनी तीक्ष्ण नजरेने ही चूक शोधली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. अनेकजण यावर 'झूम' करून पाहत आहेत आणि विनोदी प्रतिक्रियाही देत आहेत.