पुरुषार्थ मिळवण्यासाठी करणने उचललं हे पाऊल

काय म्हणाला करण? 

पुरुषार्थ मिळवण्यासाठी करणने उचललं हे पाऊल  title=

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर एक खास सेलिब्रिटी आहे जो कायमच मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत असतो. करणची बोलण्याची पद्धत आणि हजरजबाबीपणा फॅन्शना अतिशय आवडतो. पण करणच्या आयुष्यात एक अशी वेळ होती जेव्हा त्याच्या आवाजावरून लोकं खिल्ली उडवत असतं. 

हो हे खरं आहे. एकदा तर करण जोहर आपल्या आवाजात भारीपणा आणण्यासाठी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी गेला होता. करणने आपल्या आयुष्यातील या गोष्टीचा खुलासा एका कार्यक्रमात केलं आहे. 

करण म्हणतो की, 'मी लहानपणापासून ऐकत आलो की, मुलींसारखं नको बोलूस. त्यांच्यासारखा डान्स नको करूस' लोक म्हणतं असतं की, तुझा आवाज मुलींसारखा आहे. या गोष्टीमुळे करण खूप त्रासात असे. पण 15 वर्षांचा असताना त्याने स्पीच थेरपिस्टच्या माध्यमातून उपचार करून घेतला. 

करणने सांगितलं की, या सगळ्या गोष्टी ऐकून मी थकलो होतो. मग मी स्पिच थेरपिस्टला सांगितलं की, मला पुरूषांसारखा आवाज हवा आहे. मी तो कसा करू शकतो? त्या डॉक्टरने मला वॉइस ट्रेनिंग दिली. आवाज चांगला करण्यासाठी 3 वर्ष माझी प्रॅक्टिस सुरू होती. हे सेशन खूप टॉर्चर करणार असायचं. 

करणने पुढे सांगितलं की, मी माझ्या आई-वडिलांना हे नाही सांगितलं की, मी आवाज बदलण्यासाठी डॉक्टरकडे जात आहे. माझ्या घरी कायम खेळकर वातावरण असे. मी 8 वर्षांचा असताना सरगम हा सिनेमा पाहिला. ज्यातील 'डफली वाले' गाणं मला आवडलं. त्याची प्रॅक्टिस मी घरी करत असे पण मी कायमच जया प्रदा यांचा पार्टच करत असे. हे माझ्या वडिलांनी पाहिलं पण ते मला कधीच ओरडले नाहीत.