Kareena Kapoor on Marriage with Saif Ali Khan : बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. 2012 मध्ये करीना आणि सैफ लग्न बंधनात अडकले आहेत. तर त्या दोघांच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या आधी ते अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. करीना एका पंजाबी कुटुंबातून आहे तर सैफ मुस्लिम कुटुंबातून. त्या दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक देखील आहे. त्यामुळे त्या दोघांना अनेकदा ट्रोल करण्यात येते. त्या दोघांविषयी नेहमीच चर्चा सुरु असतात. दरम्यान, करीनानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केल्या नंतरच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूरनं ही मुलाखत इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. करीना वयाच्या फरकावर म्हणाली की 'वय कधी महत्त्वाचे असते, तो नेहमीपेक्षा जास्त हॉट दिसतो. मी आनंदी आहे की मी 10 वर्षांनी लहान आहे, त्याने काळजी करायला हवी. त्याला पाहून तो 53 वर्षांचा झाला आहे असे कोणीही म्हणणार नाही. वयानं काही फरक पडत नाही, आदर आणि प्रेम आणि आम्ही एकमेकांसोबत मज्जा करतो हे महत्त्वाचे आहे.'



करीनाला यावेळी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करीनानं स्पष्ट उत्तर दिलं आहे. करीना म्हणाली 'आपण अशा नात्यांवर चर्चा करण्यास खूप वेळ घालवतो. त्यासोबत आपली खूप एनर्जी घालवतो. इतकी एनर्जी की त्यांच्यात 10 वर्षांचे अंतर आहे. नात्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मज्जा करणे. सैफ आणि माझ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना पसंत करतो आणि आमच्या कंपनीचा आनंद घेतो. तो कोणत्या देवावर विश्वास करतो किंवा पालन करतो किंवा त्याचे वय काय हा चर्चेचा मुद्दा कसा असू शकतो. 


हेही वाचा : रिलेशनशिपविषयी कळलं तेव्हा घरच्यांनी डांबून ठेवलं आणि...; विशाखा सुभेदारची 'एक दुजे के लिए' लव्ह स्टोरी


करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच जाने जा या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अल्हावत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अशी चर्चा आहे की ते करीना आणि शाहिद कपूर हे लवकरच 'जब वी मेट 2' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पहिला भाग हा 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.