संजय कपूर यांच्या पहिल्या वाढदिवसाला मुलांनी दिली भावनिक श्रद्धांजली, करीनाने शेअर केला भावनिक संदेश

Sunjay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने माजी पती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केल्या आठवणी.    

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 16, 2025, 06:27 PM IST
संजय कपूर यांच्या पहिल्या वाढदिवसाला मुलांनी दिली भावनिक श्रद्धांजली, करीनाने शेअर केला भावनिक संदेश

Sunjay Kapur : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती आणि ‘सोना कॉम्स्टार’ कंपनीचे चेअरमन राहिलेले संजय कपूर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या स्मरणसत्रात त्यांच्या कुटुंबीयांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यासोबतच त्यांच्या वाढदिवसानिमित्त करिश्मा कपूरच्या मुलांनी केक कापून आणि विविध क्षण आठवून संजय कपूर यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

संजय कपूर यांचे निधन जून 2025 मध्ये झाले. त्यांच्या पहिल्या पत्नी करिश्मा कपूरसोबत संजय कपूर यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे कियान आणि समायरा आहे. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी 2003 मध्ये लग्न केले आणि ते 2016 पर्यंत एकत्र राहिले. नंतर 2017 मध्ये संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला.

संजय कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

स्मरणसत्रात करिश्मा कपूरच्या मुलांनी केक कापला ज्यावर लिहिले होते, 'हॅपी बर्थडे पापा'. करिश्मा कपूरने या केकचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. अभिनेत्री करीना कपूरने हा फोटो शेअर करत एक भावनिक संदेशही दिला. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'माझ्या समा आणि कियासाठी, डॅड नेहमी तुमची रक्षा करतील. करीना कपूरने करिश्मा कपूरला या पोस्टमध्ये टॅग देखील केले आहे.

संजय कपूरच्या दुसऱ्या पत्नीने प्रिया सचदेव यांनी देखील आपल्या माजी पतीसाठी वाढदिवसाच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली. प्रियाने लिहिले की, 'तुमचा विश्वास नेहमी तुमच्या कर्मांमध्ये दिसला, शब्दांत नाही. काही आत्मा कधीच दूर जात नाहीत ते आणखी गडद होतात असं म्हटलं आहे. 

30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद

संजय कपूर यांचे निधन पोलो मैदानावर खेळताना झाले होते. सुरुवातीला त्यांच्या मृत्यूचे कारण गळ्याच्या आत मधमाश्याचा डंक सांगितले गेले तर नंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असे म्हटले गेले. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, संजय कपूरच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीशी संबंधित काही वाद सुरू झाले आहेत. 30 हजार कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरच्या मुलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये प्रिया सचदेववर वसीयतीत फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तर संजय कपूरच्या मातेसह बहिणीने देखील प्रियाविरोधात आपले मत मांडले आहे.

FAQ

संजय कपूर यांचे निधन कसे आणि कधी झाले?

संजय कपूर यांचे निधन १५ जून २०२५ रोजी पोलो मैदानावर खेळताना झाले. सुरुवातीला गळ्यात मधमाश्याचा डंक मारल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले, पण नंतर वैद्यकीय तपासणीत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर उभा राहिला.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे वैवाहिक जीवन कसे होते?

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी २९ ऑक्टोबर २००३ रोजी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत – मुलगा कियान राज कपूर (जन्म: २००९) आणि मुलगी समायरा कपूर (जन्म: २०१२). दोघे २०१६ मध्ये वेगळे झाले आणि २०१७ मध्ये घटस्फोट झाला. नंतर संजय कपूर यांनी १९ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रिया सचदेव यांच्याशी दुसरे लग्न केले.

संजय कपूर यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या स्मरणसत्रात काय घडले?

संजय कपूर यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त (१० ऑक्टोबर २०२५) कुटुंबाने स्मरणसत्र आयोजित केले. करिश्मा कपूरच्या मुलांनी 'हॅपी बर्थडे पापा' असा शिलेख असलेला केक कापला आणि आठवणींना उजाळा दिला. करिश्माने हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले, ज्यात कुटुंबातील भावनिक क्षण दिसत आहेत.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More