कार्तिक आर्यननं खोटं बोलून मिळवला चित्रपट पण प्रदर्शित होताच...
Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा यंदाच्या वर्षी 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या करिअरमधील सगळ्यात अप्रतिम चित्रपटांमधील एक मानला जातो. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी देखील चित्रपटानं उत्तम कामगिरी केली होती. चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. पण तुम्हाला माहितीये का की कार्तिक आर्यननं या चित्रपटातील भूमिकेसाठी दिग्दर्शकाला खोटं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला जवळपास दीड वर्ष त्याला काय सहन करावं लागलं याविषयी सांगितलं.
कार्तिक आर्यननं नुकतीच एजेंडा आजकतमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान, कार्तिक आर्यनला विचारलं की कधी त्यानं चित्रपटासाठी खोटं सांगितलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देत कार्तिक आर्यननं त्याच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाचं नाव घेतलं. त्यानं सांगितलं की त्यानं या चित्रपटासाठी कबीर खानला खोटं सांगितलं होतं.
कार्तिक आर्यननं सांगितलं की कबीर खाननं त्याला विचारलं की त्याला पोहता येतं का? तर आता यावर उत्तर काय दिलं हे सांगत आर्यन खान म्हणला, "मी आधीच स्क्रिप्ट वाचली होती आणि मला ती खूप आवडली देखील होती." जेव्हा कबीर सरांनी मला विचारलं की 'प्रोफेश्नली पोहता येतं का?' मी खोटं म्हणालो की येते. खरंतर मला तितकंच पोहता येतं की बुडू शकत नाही."
हेही वाचा : आत्याचा नवरा चिरंजीवी, रामचरणशी काय नातं? अल्लू अर्जुनच्या कुटुंबात आहेत सगळेच सेलिब्रिटी
दरम्यान, चित्रपटात कार्तिक आर्यन हा प्रोफेश्नल सारखं पोहताना दिसला. याविषयी बोलताना कार्तिक आर्यननं सांगितलं की त्याला स्विमिंगची ट्रेनिंग घेण्यासाठी जवळपास दीड वर्ष लागली. यावर मस्करीत उत्तर देत कार्तिक आर्यन म्हणाला, दीड मिनिटाच्या खोट्यानं माझी दीड वर्ष घेतली. कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटात भारतातील सगळ्यात पहिल्या पॅराओलम्पिक स्वर्ण पदक विजेता मुर्लिकांत पेटकर यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. कार्तिक आर्यननं या चित्रपटात मुर्लिकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कार्तिक आर्यनचा काही दिवसांपूर्वीच 'भूल भुलैया 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला.