Amitabh Bachchan Revels His Favourite Star Kid : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ हे सध्या कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत आहे. यंदाचं KBC चं 14 वं पर्व आहे. अमिताभ हे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शोमध्ये गुजरातच्या सुरत येथील वैभवी भरतभाई पडोद्रा हॉटसीटवर बसल्या होत्या. यावेळी स्पर्धकानं अमिताभ यांना सांगितले की ‘त्यांची आवडती अभिनेत्री आलिया भट्ट आहे.’ यावर पुढे बोलत अमिताभ म्हणाले ‘ती फक्त तुमची नाही तर माझी देखील फेव्हरेट आहे.’


आवडत्या अभिनेत्रीचा विषय कसा निघाला?  


20 हजार रुपयांचा प्रश्नावर अमिताभ बच्चन यांनी वैभवी यांना प्रश्न विचारला होता की आता जे गाणं वाजेल ते कोणत्या चित्रपटातलं आहे हे ओळखा? गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील एक ऑडिओ क्लिप प्रे करण्यात आला.वैभवीने हे गाणे लगेच ओळखले आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की आलिया भट्टने या चित्रपटात काम केले आहे आणि ती तिची आवडती अभिनेत्री आहे.



दरम्यान, या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि जया यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही (Abhishekh Bachchan) उपस्थित होता. अभिनेत्री राणी मुखर्जी, गायक अरिजित सिंग आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, सध्या शाहरूख आणि अमिताभ यांच्या केमेस्ट्रीची चर्चा होताना दिसत आहे. (Kbc 14 amitabh Bachchan reveals alia bhatt is his favourite actress)