किआरा अडवाणीच्या 'त्या' न्यूड फोटोमागचं सत्य अखेर उघड; पाहा... 

कियारा अडवाणीने 2020मध्ये डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केल होतं. 

Updated: Aug 31, 2021, 08:34 PM IST
किआरा अडवाणीच्या 'त्या' न्यूड फोटोमागचं सत्य अखेर उघड; पाहा... 

मुंबई : कियारा अडवाणीने 2020मध्ये डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं. याशिवाय कियाराचं आणखी एक फोटोशूट करण्यात आलं होतं ज्यात ती एका मोठ्या पानाच्या मागे न्यूड अवस्थेत उभी असल्याचं दिसत आहे. या फोटोशूटबद्दल बराच गदारोळ झाला होता आणि म्हटलं जात होतं की, ती एक कॉपी आहे. आज आम्ही तुम्हाला कियाराच्या त्याच  फोटोबद्दल सांगणार आहोत जो फोटो कियाराचा टॉपलेस होता. चाहत्यांना वाटलं की, या शूटसाठी कियारा टॉपलेस झाली आहे.

पण डब्बूने अलीकडेच स्पष्ट केलं की, कियारा यासाठी टॉपलेस झाली नव्हती. डब्बू म्हणाला, लोकं या फोटोबद्दल काय म्हणत आहेत ते मी कायम ऑनलाइन वाचत असतो, पण कियारा माझ्या शूटसाठी टॉपलेस झाली नव्हती. ते फोटो अत्यंत काळजीपूर्वक घेण्यात आला होता.

डब्बू पुढे म्हणाले, मला अशा प्रकारचं शूट करायचं होतं की, त्यामुळे लोकांना  खूप विचार करावा लागेल. मला वाटतं की, चेहऱ्यावर खूप कामुक दिसणं हे असभ्य दिसतं. त्यामुळे लोकांसाठी काही प्रश्न सोडणं चांगलं. आजकाल कियाराचं तिच्या चित्रपटांवर वर्चस्व आहे. ती एकामागून एक हिट चित्रपट देत आहे आणि यासोबतच ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच कियाराचा शेरशाह हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियारासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कॅप्टन विक्रम बत्रावर आधारित हा चित्रपट अॅमेझॉनवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात कियाराने विक्रम बत्राची साथीदार डिंपलची भूमिका साकारली होती, ज्याचं सर्वांनी कौतुक केलं आहे. या चित्रपटानंतर कियारा 'भूल भुलैया 2', 'जुग जुग जिओ' आणि 'मिस्टर लेल.

भूल भुलैया 2 मध्ये कियारासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. जुग जुग जिओमध्ये कियारा वरुण धवनसोबत दिसणार आहे आणि मिस्टर लेलेमध्ये कियारासोबत मुख्य भूमिकेत कोण असेल हे अद्याप कळलेलं नाही.