)
Jataadhara Movie: सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत 'जटाधारा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चित्रपट प्रदर्शित होण्यपूर्वीच चाहते तिकिटे बुक करत आहेत. एवढेच नाही तर, या चित्रपटातील सोनाक्षीचा हटके लुक आणि दमदार अभिनय पाहण्यासाठी ोचाहते खूप उत्सुक आहेत. अशातच थेट या चित्रपटाच्या निर्मात्यांनी क्लायमेक्स विषयी मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले निर्माते?
निर्माते शिविन नारंग यांनी सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण वेळापत्रक अत्यंत आव्हानात्मक होते , ज्यामध्ये तीन दिवस, तीन रात्री, २४ तासांचा अविरत क्लायमॅक्स शूट होता. ते म्हणाले, "क्लायमॅक्स हा 'जटाधारा'चा आत्मा आहे. आम्हाला तो वास्तववादी आणि भव्य बनवायचा होता. सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांनी या सीनसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप मेहनत घेतली. हा आजवरच्या सर्व चित्रपटांतील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाकांक्षी क्लायमॅक्सपैकी एक असणार" ते पुढे म्हणाले, "आमच्या टीमने सलग तीन दिवस 24 तास चित्रीकरण केले. प्रत्येकाने चित्रपटात आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रयत्न केले. या चित्रपटात मोठ्या पडद्यावर पाहिला जाणरा सर्वात कठीण आणि आश्चर्यकारक क्लायमॅक्स असेल"
चित्रपटाचे नवीन गाणे, "जो लाली जो" प्रदर्शित
व्यंकट कल्याण आणि अभिषेक जयस्वाल दिग्दर्शित, "जटाधारा" हा चित्रपट पौराणिक कथा, काळी जादू, प्राचीन शाप आणि एका रहस्यमय खजिन्याच्या शोधाच्या भोवती फिरताना दिसेल. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला. 'पल्लो लटके' आणि 'धन पिसाचिनी' सारखी गाणी आधी प्रदर्शित झाली असून या गाण्याना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यवरच घेतलंय. चित्रपटाचे आणखी एक नवीन गाणे, 'जो लाली जो' शुक्रवारी (24 ओक्टोबर 2025) ला प्रदर्शित झाले.
झी स्टुडिओज प्रस्तुत
जटाधारा या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, शिविन नारंग, अरुणा अग्रवाल, प्रेरणा अरोरा, शिल्पा सिंघल आणि निखिल नंदा यांनी केली आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती अक्षय केजरीवाल आणि कुसुम अरोरा यांनी केली आहे. दिव्या विजय या क्रिएटिव्ह निर्मात्या आहेत, तर भाविनी गोस्वामी या पर्यवेक्षक निर्मात्या आहेत. चित्रपटाचे संगीत डिझाइन झी म्युझिक कंपनीने केले आहे.
कधी होणार प्रदर्शित?
'जटाधारा' चित्रपटात सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असून दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवि प्रकाश, नवीन नेन्नी, रोहित पाठक, राजीव कनकला आणि सुभलेखा सुधाकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'जटाधारा' हा चित्रपट 7 नोव्हेंबरला तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. आता हा चित्रपट त्याच्या ट्रेलर प्रमाणेच चाहत्यांंच्या अपेक्षांवर खरा उतरेल की नाही यावर सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.
FAQ