Madhuri Dixit and Dr. Nene : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत 1999 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत शिफ्ट झाली आणि तिनं चित्रपटांपासून देखील अंतर ठेवलं. त्याकाळात माधुरी ही तिच्या कुटुंबाला वेळ देत होती तर श्रीराम हे त्यांचं काम करत होते. अनेक वर्षांच्या गॅपनंतर माधुरीनं पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि त्यानंतर ती भारतात शिफ्ट झाली. त्यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा डॉक्टर श्रीराम नेने आणि दोन्ही मुलं भारतात आले. त्यावेळी माधुरीसोबत भारतात शिफ्ट होण्यासाठी डॉक्टर नेने यांनी त्यांची हार्ट सर्जनची नोकरी सोडली आणि मेडिकल टेक एन्टरप्रेन्योर झाले. त्यांच्या या निर्णयानं त्यांचे आई-वडील मात्र आनंदी नव्हते.
आता डॉक्टर नेने यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या या निर्णयाला विरोध होता. त्यांना वाटतं होतं की डॉक्टर नेने हे सगळ्यात उत्तम आयुष्य जगत होते. मी भारतीय आहे. मी एका इमिग्रेन्ट कुटुंबातून आहे आणि मी हार्ट सर्जनची नोकरी सोडणार ही गोष्टी माझ्या कुटुंबाला आवडत नव्हती. मी वर्षभरात 500 रुग्णांची ओपन हार्ट सर्जरी करायचो.
डॉक्टर नेनेंनी सांगितलं की तरुणपणी त्यांनी टेक एन्टरप्रेन्योरशिपमध्ये स्वत: चं नशिब आजमावलं, पण जसा जसा तो मोठा झाला. तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितलं की एकतर डॉक्टर होऊ शकतो किंवा इंजीनियर. 20 वर्ष डॉक्टर राहिल्यानंतर त्यांना हे आवडू लागलं. त्यानंतर जेव्हा ते त्यांच्या रुग्णांना रुग्णालयात हसताना पाहायचे हे त्यांना जणू काही एक बक्षिससारखं वाटू लागलं. पण मग मी जेव्हा पाहिलं की आपल्या पृथ्वीवर 7 बिलियन लोकं आहेत. मी म्हणालो, जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने आरोग्यसेवा घेतली आणि नंतर मीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत नेली आणि डिजिटल सीमा निर्माण केल्या म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या खिशात डॉक्टर ठेवू शकता.
हेही वाचा : निर्मात्याला मटण खाऊ घालून त्यालाच भांडी धुवायला लावली; नाना पाटेकरांचा 'तो' किस्सा माहितीये का?
पुढे त्यांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्यांच्या सहकर्मचाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी डॉक्टर नेने यांनी सांगितलं आहे. डॉक्टर नेने यांनी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्यांचे सगळे सहकर्मचाऱ्यांना आश्चर्य झालं. त्यांनी म्हटलं की नको जाऊस आम्हाला तुझी गरज आहे.