निळू फुले आणि महात्मा फुलेंचे होते जवळचे नाते; स्वतःच केला होता खुलासा, पाहा व्हिडिओ

Mahatma Jyotiba Phule And Nilu Phule Relation: दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ चांगलाच शेअर होत आहे. त्यात त्यांनी एक खुलासा केला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 12, 2025, 04:12 PM IST
निळू फुले आणि महात्मा फुलेंचे होते जवळचे नाते; स्वतःच केला होता खुलासा, पाहा व्हिडिओ
mahatma jyotiba phule and nilu phule relation actor old video goes viral

Mahatma Jyotiba Phule And Nilu Phule Relation:  ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या चित्रपटांबद्दल आजही चर्चा होते. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका खूपत गाजल्या. मात्र अभिनयाबरोबरच त्यांनी सामाजित क्षेत्रातही मोठं कार्य केले आहे. निळू फुले हे सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी होते. पण तुम्हाला माहितीये का? निळू फुलेंचे वंशज कोण आहेत. त्यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

ब्रिटिशकालीन पुण्यात शुक्रवार पेठेतल्या खडकमाळ आळीत 1932 साली नीळकंठ कृष्णाजी फुले अर्थात निळू फुलेंचा जन्म झाला आहे. अनेकदा त्यांच्या फुले अडनावावरुन ते थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे वंशज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येतो. त्याच्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द निळू फुलेंनी एका मुलाखतीत दिलं होतं. त्यांची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

मुलाखतीत निळू फुलेंना विचारण्यात आलं की, घरात प्रत्यक्षात तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे. हा म्हणजे तुम्ही फुले म्हणजे ओढून ताणून फुले नाहीत. यावर निळू फुलेंनी उत्तर दिलं की, नाही मी ओढून ताणून नाही..महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे ...डायरेक्ट अगदी . तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो. त्याच्या आधी ही त्यांचं गाव आहे तिथं मंडळी राहत होता, आजही काहीजण आहेत. फुले जेव्हा पुण्यात राहायला आली, तेव्हापासून फुले मंडळी पुण्यात स्थायिक झाली.त्याच्यामधला मी, असं निळु फुले यांनी म्हटलं होतं. 

निळू फुलेंचे थोरले बंधू 1942 च्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी येरवड्याच्या तुरूंगात कारावास सोसला होता. इतकंच नाही तर निळू फुले यांनी महात्मा गांधीनी अनेकदा पाहिलं होतं. तर साने गुरूजींच्या अनेक सभांमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिल होतं. 

निळू फुले हे सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतलं होतं. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते.