माही विज रुग्णालयात दाखल; जय भानुशालीपासून विभक्त होण्याच्या चर्चेत असताना प्रकृती खालावली

घटस्फोटांच्या चर्चा सुरु असतानाच टीव्ही अभिनेत्री माही विजची बिघडली अचानक तब्येत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर टीमने दिली हेल्थ अपडेट.    

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 7, 2025, 03:53 PM IST
माही विज रुग्णालयात दाखल; जय भानुशालीपासून विभक्त होण्याच्या चर्चेत असताना प्रकृती खालावली

Mahhi Vij : टीव्ही अभिनेत्री माही विज अलीकडेच उच्च ताप आणि तीव्र अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीबाबतची ही माहिती तिच्या पब्लिसिस्ट टीमने अधिकृतपणे पुष्टी केली आहे. सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून तिची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source

विशेष म्हणजे, माही विजच्या रुग्णालयात दाखल होण्याची ही बातमी तिच्या आणि पती जय भानुशाली यांच्या वैवाहिक मतभेदांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.

ताप आणि अशक्तपणामुळे तब्येत बिघडली

माही विजची काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. तिला उच्च ताप आणि जास्त कमजोरी जाणवत असल्यामुळे अखेर 7 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या टीमने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून ज्यात माही हॉस्पिटलमधील बेडवर विश्रांती घेताना दिसत आहे. त्यासोबत टीमने लिहिलं की, 'होय, माहीला ताप आणि खूप अशक्तपणा आहे. सध्या ती रुग्णालयात आहे. डॉक्टर तपासणी करत आहेत. अजून काही निष्कर्ष निघालेला नाही, पण तिची तब्येत आता ठीक आहे.'

घटस्फोटांच्या अफवांदरम्यान प्रकृती खालावली

गेल्या काही दिवसांपासून माही विज आणि जय भानुशाली यांच्यातील मतभेद आणि विभक्त होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही माध्यमांनी तर दावा केला की दोघांनी जुलै–ऑगस्ट 2025 मध्ये घटस्फोटाचे कागद साइन केले असून तीनही मुलांच्या कस्टडीचा निर्णयही झाला आहे.

या बातमीवर माही विजने थेट प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर कॉमेंट केली, 'खोट्या बातम्या पसरवू नका. मी यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.' तिची ही तीव्र प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जय भानुशालीचं अद्याप मौन

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेता जय भानुशाली यांनी मात्र आतापर्यंत ना घटस्फोटाच्या अफवांवर, ना माहीच्या आजारपणावर काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. जय आणि माही यांनी 2010 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर हे दोघे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक ठरले होते. दोघांनी एकत्र अनेक रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला असून त्यांचे कौटुंबिक जीवन नेहमी चर्चेत राहिले आहे.

माहीच्या तब्येतीबाबत थोडक्यात

सध्या माही विज रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती नियंत्रणात आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच तिच्या आजाराचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती तिच्या टीमकडून देण्यात आली आहे. 

FAQ

1. माही विज सध्या कुठे आहेत?

माही विज सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे.

2. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले?

त्यांना उच्च ताप आणि तीव्र अशक्तपणामुळे 7 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

3. माही विजच्या प्रकृतीची सद्यस्थिती काय आहे?

डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर आजाराचे कारण स्पष्ट होईल.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More