close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मलायका अरोराच्या खासगी आयुष्यातील 5 धक्कादायक गोष्टी

नेहा धुपियाच्या शोमध्ये केला खुलासा 

Updated: Nov 8, 2019, 04:17 PM IST
मलायका अरोराच्या खासगी आयुष्यातील 5 धक्कादायक गोष्टी

मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन आता 2 वर्षे झाली आहेत. घटस्फोटानंतर दोघेही त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. मलायका अरोरा अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे तर अरबाज खान जॉर्जियाला डेट करत आहे. घटस्फोटानंतर मुलगा अरहान खानची जबाबदारी मलायकाकडे आहे. मलायकाने नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

मलायकाने आपल्या लग्नाच्या प्लानिंगपासून ते अगदी गरोदरपणाशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींच गुपित या मुलाखतीत उघडलं आहे. या मुलाखतीत तिने 5 धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.... 

लग्नाच्या प्लानिंगबद्दल मलायका म्हणते.... 

मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर बोलताना मलायकाने आपल्या ड्रीम वेडिंगची कल्पना शेअर केली. माझं लग्न समुद्र किनारी होणार असून सगळीकडे सफेद रंग असेल. मला लग्नात सगळी गोष्ट सफेद रंगाची हवी आहे. एली साब गाऊन (ELIE SAAB GOWN) घालण्याची इच्छा मलायकाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ब्राइड्समेट्सोबत माझी गर्लगँग देखील लग्नाला असणार आहे. 

अर्जूनला वाटतं की, मी चांगले फोटो काढत नाही 

नेहासोबत बोलताना मलायकाने अर्जून कपूरशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. मलायका म्हणाली की,'मी चांगले फोटो काढू शकत नाही, असं अर्जूनला वाटतं' अर्जून मात्र माझे खूप चांगले फोटो काढतो. 

बाळंतपणानंतर अगदी 40 दिवसांनी सुरू केलं होतं काम 

नेहाच्या शोमध्ये मलायकाने आपल्या गरोदरपणाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. मलायका म्हणाली की,'मी गरोदरपणातही काम केलं आणि बाळंतपणानंतरही अगदी 40 दिवसांनी काम केलं. मी माझ्या मुलाकरता फक्त 40 दिवसांची सुट्टी घेतली होती. माझ्या आईमुळे मला काम करावं लागलं.'

रंगामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये भेदभाव 

मलायकाने सुरूवातीच्या काळात मला डार्क स्किनच्या तुलनेत अडकवलं जायचं. माझ्या रंगामुळे भेदभाव केला जायचा. त्याकाळी पक्षपाती भूमिका साकारली जायची. काळा रंग आणि गोरा रंग असा भेदभाव केला जायचा. 

अरहानप्रमाणे ही गोष्ट आहे मलायकासाठी खास 

अरहान मलायकाचा मुलगा तिच्यासाठी खूप खास आहे. पण याचबरोबर तिचा कुत्रा कॅस्पर देखील तिच्या अगदी जवळचा आहे. अनेकदा अरहान मलायकाशी कॅस्परमुळे भांडतो देखील. तो अनेकदा विचारतो देखील,'मम्मा माझ्यापेक्षा तू कॅस्परला सर्वात जास्त प्रेम करतेस ना?'तेव्हा मलायका म्हणते की,'माझे दोन मुलगे आहेत. आणि तुम्ही ते दोघे आहात.'