मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या गुपचूप सिक्रेट लग्न उरकण्याचा ट्रेन्ड आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, विकी कौशल्य आणि कटरिना यांनी गुपचूप विवाह केला. आता त्यांच्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली आहे. दक्षिण सिनेमातील प्रसिद्ध गायक मंजरी विवाहबंधनात अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंजरीच्या आवाजाची जादू लोकांच्या मनावर आहे. तिच्या लग्नाचा व्हिडीओ आणि फोटो वेगानं व्हायरल होत आहे. गायिका मंजरीने नुकतेच तिचा मित्र जेरिनशी विवाह केला. मंजरी आणि जेरिन यांनी खास मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिरुअनंतपुरममध्ये विवाह केला.


मंजरी आणि जेरिन यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल आणि पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. मंजरीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. दक्षिणात्य लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 


जेरिनने धोतर आणि लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघंही खूप सुंदर दिसत आहे. हे दोघंही बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यांनी एकत्र शिक्षण पूर्ण केलं. आता दोघंही विवाहबंधनात अडकले आहेत. 


गायिका मंजरीने लग्नानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात लिहिले आहे की, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. आमचे लग्न झाले. आम्ही मॅजिक अॅकॅडमीमध्ये मुलांसोबत दिवस घालवला. असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.'