)
केदारनाथ यात्रेदरम्यान मंजिरीने टिपलेले काही फोटो खरोखरच मन मोहून टाकणारे आहेत. बर्फानं झाकलेल्या डोंगरांमध्ये आणि निसर्गाच्या कुशीत ती उभी असलेली दृश्यं पाहून सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत 'ही फक्त ट्रिप नाही, तर एक आत्मानुभव आहे.' मंदिर बंद होण्यापूर्वी मंजिरीने दर्शन घेतल्यामुळे तिचा १२ ज्योतिर्लिंग यात्रेचा संकल्प आता पूर्णत्वाकडे जात आहे. या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात तिने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन केली होती. त्या वेळी पती प्रसाद ओकही तिच्यासोबत उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मंजिरीने वाराणसी येथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं होतं. आता केदारनाथ भेटीसह तिचा हा आध्यात्मिक प्रवास अधिक गती घेत आहे.
मंजिरी ओकने घेतलेला हा १२ ज्योतिर्लिंगांचा संकल्प केवळ धार्मिक नसून, तिच्यासाठी तो आत्मशांतीचा मार्ग ठरत आहे. प्रत्येक ठिकाणी ती श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेते आणि ते क्षण चाहत्यांशी शेअर करते. तिच्या पोस्टमधून तिची आध्यात्मिक ओढ स्पष्ट दिसते.
केदारनाथ हे हिमालयात वसलेलं एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हिवाळ्यातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे मंदिर दरवर्षी दिवाळीनंतर, भाऊबीजेच्या दिवशी भाविकांसाठी बंद केले जाते. परंपरेनुसार, मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर भगवान केदारनाथाची मूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात हलवली जाते, आणि तेथेच पुढील सहा महिन्यांसाठी पूजाअर्चा केली जाते. यंदा 23 ऑक्टोबर रोजी मंदिराचे दरवाजे बंद होणार असून, त्यापूर्वी हजारो भाविक दर्शनासाठी केदारनाथ धामात पोहोचत आहेत.
अलीकडेच अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी यांसारख्या अनेक मराठी अभिनेत्री केदारनाथला भेट देऊन आल्या आहेत. मराठी कलाकारांमध्येही सध्या आध्यात्मिकतेची ओढ वाढताना दिसत आहे. मंजिरी ओकच्या या यात्रेने पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे की, ग्लॅमरच्या दुनियेसोबतच कलाकारही भक्तीचा मार्ग निवडत आहेत.
FAQ
मंजिरी ओक केदारनाथला का गेली होती?
मंजिरी ओक ही तिच्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी केदारनाथला गेली होती.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार आहेत?
यंदा केदारनाथ मंदिराचे दरवाजे 23 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहेत.
मंजिरी ओकने या यात्रेतील इतर कोणती स्थळं भेट दिली आहेत?
मंजिरीने यापूर्वी त्र्यंबकेश्वर आणि काशी विश्वेश्वर (वाराणसी) या ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे.